सांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर (ता. वाळवा) या गावी कृषी विभागाच्या योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उजेडात आला. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना कृषी साहित्य व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदानात हा घोटाळा झाला आहे. हयात नसलेल्या व्यक्तीच्या नावे कृषी साहित्याचे वाटप, वीज कनेक्शन नसतानाही २८ जणांना कृषिपंप वाटप करण्यात आले असून भूमिहीनांनाही कृषी योजनांचा लाभ देण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत बळीराजा संघटनेचे बी. जी. पाटील व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी भ्रष्टाचाराचे पुरावेच सादर केले. सदाभाऊंनी मात्र याचा इन्कार केला आहे. हेतुपुरस्सर गावाला बदनाम करण्यासाठी काहींनी हा उद्योग चालविला असून त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, असे ते म्हणाले.
सदाभाऊ खोत यांच्या गावातच कृषी विभागाचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 6:02 AM