सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते, बियाणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी कृषी विभागाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यासाठी विविध प्रकारचे २८ हजार ४८५ क्विंटल बियाणे, एक लाख ८० हजार ६१५ टन खतांची मागणी केलेली आहे. खरीप हंगामामध्ये १५ टक्के क्षेत्रावर पेरणी न झाल्यामुळे २७ हजार हेक्टरने रब्बीची पेरणी क्षेत्र वाढणार आहे.जिल्ह्यात १५१ गावे पूर्ण रब्बीची गणली जात असली तरी खरीप आणि रब्बी पेरणीच्या गावांची संख्या २५१ पर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी रब्बीची पेरणी दोन लाख १७ हजार ७४७ हेक्टरवर पेरणी झाली होती. या वर्षी दोन लाख ४४ हजार ८०० हेक्टरपर्यंत होण्याची शक्यता आहे. बियाणांची कमतरता, गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्ह्यात ११ पथकांची नियुक्ती केली आहे. हंगामात शाळू ज्वारी, हरभरा, मक्याचे क्षेत्र सर्वाधिक असते. परतीच्या पावसावर रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र जत, आटपाडी तालुक्यात असून, शाळू ज्वारीची पेरणी केली जाते. त्यानंतर कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज पूर्व भागात रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे.
रब्बीतील प्रमुख पिकेरब्बी हंगामात शाळू ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल, भुईमूग, तीळ ही प्रामुख्याने पिके घेतली जातात. शाळूचे पीक सर्वाधिक घेतले जाते. शेतकरी प्रत्येक वर्षी बीजप्रक्रिया केलेले बियाणेच वापरतात. यामुळे चांगले उत्पादन मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. काही मोजकेच शेतकरी घरातील बियाणांवर प्रक्रिया करून वापरत असल्याचे चित्र आहे.
अशी आहे बियाणांची मागणीपिक - बियाणे क्विंटलमध्येज्वारी - ४९३७गहू - १००४५मका - ३१५०हरभरा - १०१३६करडई - १२६सूर्यफूल - ७५कांदा - १६एकूण २८४८५
रासायनिक खतांची मागणीखत प्रकार - मागणी टनातयुरिया - ५४४६०डीएपी - २१८३७एमओपी - २२१३४कॉप्लेक्स - ४१४५४एसएसपी - ३१६५४इतर खते - ९०७२एकूण - १८०६१५
रब्बी हंगामासाठी लागणारे बियाणे आणि रासायनिक खतांचा मुबलक साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. कोणत्याही रासायनिक खताची टंचाई निर्माण होणार नाही, असे नियोजन पूर्ण केले आहे. कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी ११ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. -विनायक पवार, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली