सांगली - शिराळा तालुका हा भात पिकाचे माहेर घर म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील कुसाईवाडी येथे शेतकरी सर्जेराव भाऊ पन्हाळकर यांच्या बांधावर जाऊन धुळवाफ पेरणी केली. उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे अभियान राज्यामध्ये राबवले जात आहे याच अभियान अंतर्गत पेरणी करीता सदाभाऊ खोत हे थेट शेतकऱ्याच्या बांधावर गेले. प्रथम भाऊंनी काळ्या आईचे पूजन केले. यानंतर आमदार शिवाजीराव नाईक साहेब व कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बैल व पाबरी वरती धान्याची ओंजळ हातात घेऊन स्वतः पेरणीला सुरुवात केली.
कुसाईवाडी येथे 2 मुलींच्या जन्माचे स्वागत सदाभाऊ खोत व शिवाजीराव नाईक साहेब यांनी केले. यावेळी मुलीच्या आईंना साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच २५/१५ योजनेअंतर्गत कुसाईवाडी येथे मंजूर हायमस्ट दिव्याचे भूमिपूजन खोत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, जिल्हाकृषी अधीक्षक राजेंद्र साबळे, विकासकाका देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी हणमंत इंगवले, तालुका कृषी अधिकारी जी.एस.पाटील, सरपंच विनोद पन्हाळकर, बी.आर निकम, अजित भोसले, अनिकेत माने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.