सांगली : माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृध्द व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि. 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.महाराष्ट्र शासनाच्या सुचनांनुसार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी यंदाच्या वर्षी पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्याचे उत्पन्नवाढ या त्रिसुत्रीचा अवलंब कृषि विभाग करणार आहे. खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ या कालावधीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून संवाद साधणार आहेत.कृषि तंत्रज्ञानाचा छोटासा अवलंब पिक उत्पादन वाढीमध्ये मोठा परीणाम करू शकतो. या अनुषंगाने परिणामकारक प्रचार व जनजागृती करण्यासाठी दि. 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषि व संलग्न विभागाच्या सहभागातून कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी 1 ते 7 जुलै कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 4:59 PM
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृध्द व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि. 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी 1 ते 7 जुलै कालावधीत कृषि संजीवनी सप्ताहकृषि संजीवनी सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन