ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील सारिका संतोष पाटील (वय ३६) या विवाहितेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी दहापूर्वी ही घटना घडली आहे.
सारिकाला आत्महत्या करण्यासाठी सासरच्या किशोर सुभाष पाटील, संस्कृती किशोर पाटील, सुभाष निवृत्ती पाटील, सखुबाई सुभाष पाटील, शिवाजी निवृत्ती पाटील यांनी प्रवृत्त केले असल्याची फिर्याद तिचे भाऊ रूपेश दिलीप पाटील (रा. नाटोली, ता. शिराळा) यांनी दिली आहे.
कुरळप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सासरकडील लोकांकडून सारिकाचा नेहमी जाच केला जात होता. माहेरकडून दागिने घेऊन ये, मुलावरील औषधोपचार माहेरच्या लोकांनीच केला पाहिजे, घरखर्चासाठी माहेरच्या लोकांनी पैसे दिले पाहिजेत, घरासाठी काढलेले कर्ज भागविण्याकरिता पैसे घेऊन ये, अशी मागणी सारिकाला तिच्या सासरच्या लोकांकडून केली जात होती. यामुळे सारिका सतत मानसिक तणावाखाली होती. या जाचाला कंटाळून सारिका हिने मंगळवारी घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.