शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
2
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
3
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
4
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
5
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
6
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
7
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
8
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
10
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
11
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
12
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
13
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
14
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
15
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
16
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
17
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
18
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
19
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
20
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया

अजित पवार गटाची तासगावात चाचपणी, आर. आर. पाटील गट एकसंध 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 6:48 PM

भाजपच्या नेत्यांनी जवळीक वाढविली

दत्ता पाटीलतासगाव : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आर. आर. पाटील यांच्या वारसदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा ठाम निर्धार केला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अस्तित्व दाखविण्यात अपयश आले. मात्र, अजित पवार गटाकडून तासगाव तालुक्यात चाचपणी सुरू असून, राष्ट्रवादीतील कार्यकर्ते गळाला लागतात का? याचा कानोसा घेतला जात आहे. दरम्यान, तासगाव-कवठेमहांकाळमधील भाजपच्या नेत्यांनी अजित पवार यांच्याशी जवळीक साधल्याचे दिसत आहे.तासगाव तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी असे दोन प्रमुख तुल्यबळ गट आहेत. खासदार संजय पाटील आणि आर. आर. पाटील गट हेच तालुक्यातील प्रमुख गट राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी राज्यभर स्वतःचा गट सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी समर्थकांना आपल्या बाजूला घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधून भेटीचा सांगावा पाठविला होता. मात्र, अद्यापपर्यंत अजित पवार यांच्या गळाला राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता लागला नसल्याचे दिसून येत आहे.तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादी गावपातळीवर अनेक गट आहेत. या गटांतर्गत राजकारणामुळे नाराजीचा सूरही आहे. आर. आर. पाटील यांच्या पश्चात तासगाव तालुक्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे जयंत पाटील समर्थकांची संख्या लक्षणीय झाली होती. त्यामुळे जयंत पाटील यांना मानणारा एक स्वतंत्र गट अलीकडच्या काळात तासगाव तालुक्यात तयार झाला आहे.राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार जयंत पाटील आणि आमदार सुमनताई पाटील या दोघांनीही शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केल्यामुळे तालुक्यात फारशी उलथापालथ झाली नाही. जयंत पाटील यांना मानणारा तालुक्यातील गटदेखील ‘आम्ही साहेबांबरोबर’ असा नारा देत राष्ट्रवादीसोबतच राहिला आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतरदेखील एकसंध राहिला आहे.

भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचे अभिनंदनखासदार संजय पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अजित पवार महायुतीत आल्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भाजपच्या नेत्यांची अजित पवार यांच्याशी सलगी वाढल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही अजित पवार यांना उपमुख्यमंत्री मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे फलक काही ठिकाणी लावले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारRohit Patilरोहित पाटिल