Ajit Pawar : नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्याची दखल, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 06:08 PM2021-07-26T18:08:52+5:302021-07-26T18:09:54+5:30

Ajit Pawar : "सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.

Ajit Pawar : Taking note of Narayan Rane's 'that' statement about CM, the Deputy Chief Minister took an important decision | Ajit Pawar : नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्याची दखल, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

Ajit Pawar : नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्याची दखल, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

Next

सांगली - राज्यातील पूर परिस्थितीमुळे अनेक भागांत मोठं नुकसान झालं आहे. चिपळूण दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी मोठा संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर तक्रारींचा पाढ वाचला. त्यानंतर नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून फैलावर घेतलं. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी नाव न घेता केंद्रीयमंत्र्यांच्या दौऱ्यात असे संबोधत नारायण राणेंना वक्तव्याची दखल घेतल्याचं दिसून आलं. 

"सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा," असं म्हणत नारायण राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. "मला कोणीही सीईओ भेटले नाहीत. मी इथेच बाजारपेठेत उभा आहे. कोण सीईओ आहेत आणि कुठे आहेत हे मला दाखवा," असंही राणे म्हणाले. राणेंच्या या संतापाची दखल घेत, आता नोडल ऑफिसर नेमण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. 

अजित पवार यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या पूरग्रस्त भागात पाहणी दौरे सुरू आहेत, यापुढेही ते सुरूच राहतील. केंद्रीयमंत्री आले होते, विरोध पक्षाचे नेते आले होते. विरोधी पक्ष त्यांच्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करेलच. तर, सरकारच्याबाजूचे लोकं मदतीसाठी प्रयत्न करतील. पण, यापुढे जिल्हाधिकारी यांना वेळ मिळावा म्हणून नोडल ऑफिसर नेमण्यात येणार आहेत. या पाहणी दौऱ्यातील मंत्र्यांसोबत, नेत्यांसोबत नोडल ऑफिसर फिरेल. बाकीचे सर्व सनदी अधिकारी आपल्या कार्यालयातून कामकाज पाहतील, असे अजित पवार यांनी सांगितले. महापालिका आयुक्त, सीईओ, एसपी हे सर्व अधिकारी आपलं काम पाहतील, असेही पवार म्हणाले. 

नायतर प्रत्येकजण इथं येऊन, तू कशाला इकडे गेला, तू कशाला तिकडे गेला... अरे कशाला गेला.. कशाला गेला... म्हणजे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याचा तो प्रोटोकॉल आहे, त्यानुसार त्यांना तेथे जावंच लागतं. उद्यापासून अजून दौरे वाढतील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही या निर्णयाला सहमती दर्शवल्याचे अजित पवारांनी सांगितलं. 

भाजप नेत्यांकडून पाहणी
केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूण येथे जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "मुख्यमंत्री आले त्यांनी पाहणीही केली. ते त्यांच्या पद्धतीने आढावा घेतीलच. मात्र, आपणही पंतप्रधानांना रिपोर्ट देणार आहोत. येथील नागरिकांना कशा प्रकारे दिलासा देता येईल आणि पुन्हा आपल्या पायावर उभे करता येईल यावर विचार करू. हे सर्व लोक आमचे आहेत यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, याची काळजी घेऊ," असं राणे पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले होते. 

मुख्यमंत्र्यांवर टीका
"राज्यावर सातत्याने येणाऱ्या संकटांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायगूणच कारणीभूत आहे,. ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात वादळं काय, पाऊस काय, कारोना काय, सर्व सुरूच आहे. एवढेच नाही, तर कोरोना ही त्यांची देन आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का?," अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. 

Web Title: Ajit Pawar : Taking note of Narayan Rane's 'that' statement about CM, the Deputy Chief Minister took an important decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.