आष्टा : मिरजवाडी (ता. वाळवा) येथील अक्षरा किशोर माने या पाच वर्षाच्या मुलीने बुद्धिमत्तेच्या जोरावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरल्याबद्द्ल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अक्षराने ३१ देशांची नावे व शिवाजी महाराजांची वंशावळ सांगितली. अक्षरा मानेला ६ मराठी गाणी, २ ते ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ आहेत. २३१ देशांची नावे ३ मिनिटात सांगते. भारतातील सर्व राज्ये व त्यांच्या राजधान्या, महाराष्ट्रातील सर्व उंच शिखरे, त्याची उंची ठिकाणासह सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ तिला तोंडपाठ आहे. वेगवेगळ्या इंटरनेट साईट व त्याचे संस्थापकही तिला सांगता येतात. महाराष्ट्रातील सर्व बँका व त्यांची स्थापना वर्षे तिला पाठ आहेत.
यावेळी सरपंच विपिन खोत, राजारामबापू बँकेचे संचालक अनिल गायकवाड, अभियंता अरविंद खोत, वडील किशोर माने, आई जान्हवी माने, हरिदास पाटील, जि. प. सदस्य संभाजी कचरे आदी उपस्थित होते.
फोटो : २११२२०२०-आयएसएलएम-आष्टा अक्षरा माने न्यूज
फोटो ओळ : मिरजवाडी (ता. वाळवा) येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अक्षरा मानेचा सत्कार केला. यावेळी अनिल गायकवाड, अरविंद खोत, किशोर माने, जान्हवी माने, संभाजी कचरे उपस्थित होते.