शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

तुजारपूरच्या महाराजांचे आळंदी ते पंढरपूर लोटांगण

By admin | Published: June 17, 2017 12:18 AM

तुजारपूरच्या महाराजांचे आळंदी ते पंढरपूर लोटांगण

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथील आत्माराम निकम (महाराज) यांनी पांडुरंगावरील गाढ श्रद्धेतून आळंदी ते पंढरपूर हे २८५ किलोमीटरचे अंतर चक्क लोटांगण घालत पूर्ण केले आहे. यासाठी त्यांना ४३ दिवस लागले. याबद्दल त्यांचा माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते ग्रामस्थांनी जाहीर सत्कार केला. यावेळी आ. पाटील यांनी, आत्माराम महाराज यांच्या ‘लोटांगणा’ची नोंद गिनीज बुकमध्ये व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.६५ वर्षीय आत्माराम महाराजांनी २३ एप्रिलला लोटांगण घालण्यास सुरूवात केली. दररोज सकाळी ते लवकर लोटांगण घालायला सुरुवात करत. कधी ८, तर कधी ९ किलोमीटर अंतर पार केल्यावर ते थांबत. त्यावेळी त्यांच्याबरोबर तुजारपूरचे नाथ महाराज, तर काही दिवस सुरुलचे नारायण पाटील होते. ते जेथे लोटांगण थांबवत, त्या गावात जेवणाची काही सोय झाली तर ठीक, नाही तर स्वत: जेवण बनवत. त्यांनी घरासह गावातील कोणालाच हे सांगितले नव्हते. त्यामुळे पहिल्या १५ दिवसात याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मात्र १५ दिवसांनंतर गावाकडे त्यांच्या कुटुंबियांना समजले. त्यानंतर दररोज तुजारपूर, उरूणवाडी या गावातील भाविक आत्माराम महाराजांच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊ लागले.आत्माराम महाराज म्हणाले की, ग्रामदैवत भैरोबा, माझे आई, वडील व तुजारपूर, उरूणवाडी या गावातील लोकांच्या कृपाशीर्वादाने मी हे करू शकलो. आपण प्रपंचासाठी किती देह झिजवितो, मग देवासाठी थोडा देह झिजवायला नको का? भविष्यात नर्मदा परिक्रमा करणार आहे. गजानन लाहुडकर महाराज, पुण्याचे जगदीश बोधाटे, मांडवीचे मारुती साळुंखे यांचे त्यांना सहकार्य लाभले.राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी आत्माराम महाराजांच्या उपक्रमाचे कौतुक करून, भविष्यात आध्यात्मिक प्रसारातून तरुणांतील व्यसनाधिनता कमी होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. माजी सरपंच वसंतराव पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सतीश पाटील व पंडित सुतार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ऋषिकेश पाटील याने आभार मानले. युवक कार्यकर्ता संतोष पाटील याने सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमास संचालक विराज शिंदे, पं. स. सदस्य जनार्दन पाटील, प्रकाश पाटील कराड, दीपक निकम शेरे, तुजारपूरचे कृष्णात बाबर, भीमराव बाबर, सौ. मंगल बाबर, दूध संस्थेचे अध्यक्ष संभाजी पवार, रामचंद्र पाटील, हंबीरराव बाबर, संतोष बाबर तुकाराम यादव, कृष्णात सासणे, विशाल निकम, शंकर गुरुजी, भास्कर पाटील, रमेश पाटील उपस्थित होते.