शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तिघे दोषी

By admin | Published: February 22, 2017 11:22 PM

रुग्णवाहिकेत प्रसुती प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल सादर

सांगली : महापालिकेच्या प्रसुतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या वादात गर्भवती महिलेची महापालिकेच्या रुग्णवाहिकेतच प्रसुती झाल्याप्रकरणी संबंधित प्रसुतिगृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दोन महिला कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईची शिफारस चौकशी समितीने आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडे बुधवारी केली. प्रसुतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाबद्दल स्थायी समितीच्या सभापती संगीता हारगे यांनी संताप व्यक्त केला असून, प्रसुतिगृहातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.महापालिकेच्या प्रसुतिगृहात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची प्रसुती प्रसुतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकासमक्ष झालेल्या वादावादीत रुग्णवाहिकेतच झाली. ही घटना १८ फेब्रुवारीरोजी घडली. याबाबत प्रसारमाध्यमांतून वृत्त प्रसिध्द होताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. यानंतर स्थायी समितीच्या सभापती संगीता हारगे यांनी प्रसुतिगृहातील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या अहवालात प्रसुतिगृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटना घडल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. रेश्मा मुल्ला ही महिला प्रसुतीसाठी सकाळी ९.१५ वाजता प्रसुतीसाठी दाखल झाली होती. संबंधित नर्सनी डॉ. जान्हवी दोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोनच उचलला नाही. अकरा वाजता आल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली असता, बाळाने पोटात शौच केल्याचे लक्षात आले. यामुळे बाळास धोका असल्याबाबत संबंधित रूग्णाच्या नातेवाईकास कल्पना देण्यात आली. त्यांनी ११.१५ वाजता रूग्ण महिलेस शासकीय रूग्णालयात नेण्याची तयारी दर्शवली. सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून महिलेला नेले, सफाई स्टाफने रुग्णवाहिकेसोबत जाण्यावरुन प्रभारी पर्यवेक्षिका मीना लोंढे, सफाई कर्मचारी पूनम ओहर यांच्यात नातेवाईकांसमक्ष वादावादी झाली. यामुळे लोंढे यांनी स्टाफ नर्स छाया मोरे यांना रुग्णाबरोबर जाण्यास सांगितले. त्यादिवशी शनिवारी आठवडा बाजार असल्याने रूग्णालयाबाहेर गर्दी होती. परिणामी रुग्णवाहिका बाहेर काढण्यास विलंब झाला. काँग्रेस भवननजीक जाताच संबंधित महिलेच्या पोटात दुखू लागले. प्रसुती होणार हे लक्षात येताच संबंधित नर्सने गाडी थांबवायला सांगितली. ११.३७ वाजता महिलेची गाडीतच प्रसुती झाली. रुग्णवाहिका वळवून प्रसुतिगृहाकडे आणण्याची सूचना नर्सने केली. ही बातमी दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहरात चर्चेची ठरली. (प्रतिनिधी)