शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादी आशेवर, भिस्त रोहित पाटलांवर; पण..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 2:00 PM

तासगाव नगरपालिकेत सत्तेत येण्यासाठी सगळ्याच पक्षांनी ताकद लावली आहे. नेत्यांकडून उमेदवारीची जुळवाजुळव करण्यासाठी सुरुवात केली आहे.

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव नगरपालिकेत चमत्कार घडवून सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी चालविली आहे. इच्छुकांचीदेखील भाऊगर्दी झाली आहे. मात्र, पालिकेत सत्तेत येण्याच्या आशेवर असलेल्या राष्ट्रवादीची सगळी भिस्त युवा नेते रोहित पाटील यांच्यावरच असल्याचे दिसून येत आहे. मात्र, सत्तेत येण्याआधी रोहित पाटील यांना भाजपच्या नेत्यांसोबत ‘अंडरस्टॅण्डिंग’ असल्याच्या चर्चा मोडीत काढण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.तासगाव नगरपालिकेत सत्तेत येण्यासाठी सगळ्याच पक्षांनी ताकद लावली आहे. नेत्यांकडून उमेदवारीची जुळवाजुळव करण्यासाठी सुरुवात केली आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीला नेतृत्व नसल्याचे चित्र होते. शहरातील प्रस्थापित कारभाऱ्यांनी कातडी बचाव धोरण स्वीकारत रिंगणातून माघार घेतली. राष्ट्रवादीकडून अस्तित्वाची लढाई म्हणून नवख्या उमेदवारांना रिंगणात उतरून कसेबसे लढण्याची वेळ आली. मात्र, त्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे आठ उमेदवार विजयी झाले. नगराध्यक्षपदाचा उमेदवार काठावर पराभूत झाला.पाच वर्षांपूर्वी पराभूत मानसिकेतेनेच निवडणूक लढवली गेली होती. मात्र, आर.आर. पाटील यांची पुण्याई मतदानातून दिसून आली. राष्ट्रवादीची व्होट बँक भक्कम असल्याचे स्पष्ट होऊन देखील गेल्या पाच वर्षांत शहरात ठोस कामगिरी दिसून आली नाही. आठ नगरसेवक असूनदेखील कोणताच प्रभाव दिसला नाही. केवळ स्टंटबाजीच्या पलीकडे नगरसेवक गेले नाहीत. इतकेच नव्हे, तर सत्ताधाऱ्यांवर भ्रष्ट कारभाराचे आरोप होत असतानाच, राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांवरदेखील आरोप होत राहिले. त्यामुळे यावेळी नगरपालिका निवडणुकीची सर्व भिस्त रोहित पाटील यांच्यावरच राहणार आहे.

अंडरस्टॅण्डिंगची चर्चा पक्षासाठी अडचणीचीरोहित पाटील यांच्यामुळे कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्तेत येण्याचा चमत्कार झाला. तशीच पुनरावृत्ती तासगाव पालिकेतही दिसून येईल, अशी आशा राष्ट्रवादीला आहे. त्यामुळे जुन्या, नव्या इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. मात्र, कवठेमहांकाळची समीकरणे तासगावला लागू पडणारी नाहीत. तासगाव शहरासह तालुक्यात काही वर्षांपासून अंजनी आणि चिंचणीच्या अंडरस्टॅण्डिंगची चर्चा सातत्याने होत आहे. ही चर्चा राष्ट्रवादीला अडचणीची ठरणारी आहे. रोहित पाटील यांना ही चर्चा मोडीत काढावी लागणार आहे. त्यानंतरच पुढची वाटचाल सुकर होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Patilरोहित पाटिल