लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : भाजप सरकारच्या सर्व योजना अपयशी ठरत आहेत. यात सरकारचे नाकर्तेपण खूप मोठे असून, नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचे काम भाजप सरकार करत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या बाबतीत जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे. शासनाच्या विविध घोषणांमधील दोष दाखवून राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी ताकदीने प्रयत्न करावेत, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.
कवठेमहांकाळ तालुक्यातील विविध सेलच्या तालुकाध्यक्ष व पदाधिकारी निवडीप्रसंगी आयोजित राष्टÑवादीच्या बैठकीत ते बोलत होते.आ. जयंत पाटील म्हणाले, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांना पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. सर्वच जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने राष्टÑवादीचे काम करावे. निष्ठावंताला नक्कीच संधी दिली जाईल.
आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, आगामी ग्रामपंचायत निवडणूक राष्टÑवादी पक्षाच्या चिन्हावर लढवायची आहे. स्वबळावर निवडणुका जिंकून राष्टÑवादीची ताकद व दलबदलू लोकांना त्यांची जागा दाखवून देऊया. नवीन संधी देण्यात आलेल्या सर्व सेलच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या संधीचे सोने करावे.
महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे म्हणाल्या, आबांचे व अण्णांचे विचार जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आर. आर. आबा व विजयअण्णा यांचे विचार जपण्यासाठी युवकांनी जास्तीत जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. युवकच राष्टÑवादीचे तारणहार आहेत. त्यामुळे आगामी २८ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी ताकदीने काम करा.युवकचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, नगराध्यक्षा साधना कांबळे, गणेश पाटील, मोहन खोत, टी. व्ही. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी
जिल्हा बॅँकेचे संचालक सुरेश पाटील, सभापती मनोहर पाटील, गजानन कोठावळे, चंद्रशेखर सगरे, दीपकराव ओलेकर, दत्ताजीराव पाटील, बाळासाहेब कोठावळे, भगवान वाघमारे, जगन्नाथ कोळेकर, अजित कांडे, अय्याज मुल्ला, वर्षा वाघमारे, सुरेखा कोळेकर, संगीता परदेशी, बाळूताई झुरे, छायाताई पाटील, सविता माने, जीवनराव भोसले, एम. के. पाटील, विलासराव कोळेकर, किशोर पाटील, शीतल परदेशी, अमर पाटोळे उपस्थित होते.राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष नारायण पवार व संजय पाटील यांनी आभार मानले. संजय सुंगारे यांनी सूत्रसंचालन केले.