सांगली : येथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कर्नाटकातील कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी २२ दरवाजांपैकी १८ दरवाजेच खुली असल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांना सांगलीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व दरवाजे उघडण्याची सूचना केली. त्यानुसार शनिवारी हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व २२ दरवाजे उघडले आहेत.सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी हिप्परगी येथे भेट देऊन तेथील विसर्गाची माहिती घेतली. बंधाऱ्याची पाहणी केल्यानंतर २२ दरवाजांपैकी केवळ १८ दरवाजेच उघडे असल्यामुळे कृष्णा नदीतील पाण्याला फूग येत होती. म्हणून हिप्परगी बंधारा येथील अधिकाऱ्यांना तत्काळ सर्व गेट खुले करण्याची सूचना अधीक्षक अभियंता पाटोळे यांनी दिली होती. त्यानुसार शनिवारी हिप्परगी बंधाऱ्यावरील अधिकाऱ्यांनी सर्व २२ दरवाजे उघडले आहेत.पाटबंधारे विभागाची यंत्रणा २४ तास सतर्कअधीक्षक अभियंता पाटोळे म्हणाले, हिप्परगी बंधाऱ्यावर ऐनापूर व हल्ल्याळ या दोन सिंचन योजना आहेत. त्यासाठी या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग केला जातो. या बंधाऱ्याचे २२ दरवाजांपैकी १८ दरवाजे खुले होते. हिप्परगी बंधाऱ्यावरील अधिकाऱ्यांना कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर असल्यामुळे सर्व दरवाजे उघडण्यात यावेत, अशी सूचना दिली होती. त्यानुसार हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडले आहेत.
सांगलीतील अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर हिप्परगीची सर्व २२ दरवाजे उघडली
By अशोक डोंबाळे | Published: July 20, 2024 6:56 PM