भाजप सरकारला शेतकरी, कामगारांना अ‍ॅलर्जी : विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 06:12 PM2020-10-31T18:12:22+5:302020-10-31T18:13:53+5:30

Congress, sangli, vishwjit kadam, bjp देशातील भाजपच्या सरकारला शेतकरी व कामगारांची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांनी दोन विधेयक आणून त्याद्वारे या घटकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शनिवारी केली.

Allergy to BJP government, farmers and workers: Vishwajeet Kadam | भाजप सरकारला शेतकरी, कामगारांना अ‍ॅलर्जी : विश्वजीत कदम

भाजप सरकारला शेतकरी, कामगारांना अ‍ॅलर्जी : विश्वजीत कदम

Next
ठळक मुद्देभाजप सरकारला शेतकरी, कामगारांना अ‍ॅलर्जी : विश्वजीत कदमसांगलीत काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

सांगली : देशातील भाजपच्या सरकारला शेतकरी व कामगारांची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांनी दोन विधेयक आणून त्याद्वारे या घटकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शनिवारी केली.

सांगली शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीनेकाँग्रेस भवनासमोर शनिवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगारविषयक विधेयकास विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते आदी उपस्थित होते.

गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, शेतकरी, कामगारविरोधी कायदे करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या. कदम यावेळी म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने जी दोन विधेयके मंजूर केली त्यातून शेतकरी व कामगार वर्ग अडचणीत आला आहे.

या सरकारने वेळोवेळी आपल्या धोरणातून या घटकांविषयीचा द्वेष दाखवून दिला आहे. हे सरकार मोजक्या उद्योगपतींसाठी काम करते. त्यांना केवळ उद्योजकांचे भले करायचे आहे. त्यामुळे त्यांना अन्य घटकांशी काही देणेघेणे नाही.

काँग्रेस सरकार शेतकऱ्यांना अन्नदाता मानते. शेतकरी आणि कामगारांनी या देशाला घडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे या वर्गासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. महात्मा गांधींच्या विचाराने आम्ही हे सत्याग्रह आंदोलन करीत आहोत. पृथ्वीराज पाटील यांनी आंदोलनाची भूमिका यावेळी स्पष्ट केली. विशाल पाटील, डॉ. नामदेव कस्तुरे यांची भाषणे झाली.

विरोधकांनी त्यांचे काम करावे

महाराष्ट्र हा कोणत्या पक्षाचा नसून तो सामान्य माणसांचा आहे. त्यामुळे याचे भान ठेवून विरोधकांनी येथील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून मदत आणावी. आम्ही आमचे काम केले आहे, त्यांनी आता त्यांचे काम करावे, असा टोला कदम यांनी भाजप नेत्यांना लगावला.

Web Title: Allergy to BJP government, farmers and workers: Vishwajeet Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.