कुपवाड : कुपवाड शहर व परिसरातील खोक्यातील व्यवसाय कोविडच्या सर्व नियमांचे पालन करीत पूर्ववत चालू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी कुपवाड शहर व परिसर खोकीचालक संघटनेचे अध्यक्ष महादेव मगदूम यांनी महापालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे शुक्रवारी केली आहे.
मगदूम यांनी निवेदनात म्हटले आहे की, कुपवाड शहरात शंभराहून अधिक छोटे-मोठे व्यवसायधारक आहेत. दीड वर्षात परिस्थिती फार खालावली आहे. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. वीज बिल, शैक्षणिक खर्च, उदरनिर्वाहाचा खर्च आणि इतर शासकीय खर्च सुरूच आहेत. तुटपुंज्या उत्पन्नाचे साधन पूर्णतः बंद आहे. याचा विचार करून ज्या पद्धतीने अत्यावश्यक सेवांना व्यवसाय करण्यास शिथिलता दिली आहे. त्याच पद्धतीने आम्हांसही सर्व नियम पाळून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.
यावेळी खोकीचालक संघटनेचे शाम भाट, रवी अदाटे, सुभाष मगदूम, गणेश सूर्यवंशी, दगडू कोरे, बाबासाहेब जमदाडे, प्रवीण गौंडाजे, रोहित दुधाळ, सुरेश हजारे, आदी उपस्थित होते.