श्रीनिवास नागेसांगली : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांनी सोमवारी कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावरून पक्षबांधणीसाठी पुन्हा दंड थोपटले. सख्ख्या पुतण्यासह विश्वासू सहकाऱ्यांनी दगा दिला असताना चर्चेतील तीन तरुण चेहऱ्यांनी मात्र ‘शरद पवार’ या आश्वासक चेहऱ्यालाच पसंती दिली आहे.
पवारांचे नातू आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक आणि दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची कऱ्हाडमधील उपस्थिती चर्चेची ठरली. रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून २०१९ मध्ये भाजपचे मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. अस्मान दाखविले होते. जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या रोहित यांनी आजोबा शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
वडिलांच्या अनुपस्थितीत धुराप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन दिवस मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांचे पुत्र प्रतीक कऱ्हाडला कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. नुकतीच राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या प्रतीक यांच्याकडे राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्षपदही आहे. त्यांनी वडिलांची अनुपस्थिती जाणवू दिली नाही.
शरद पवारांसोबत सामान्य माणूस : रोहित पाटीलशरद पवार यांनी सामान्य माणसाला सत्तेच्या प्रवाहात आणण्याचे मोठं काम केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा त्यांच्याबरोबरच राहणार असून, येणाऱ्या काळात राष्ट्रवादी हा राज्यात सर्वांत मोठा पक्ष बनेल, असा विश्वास माजी मंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी व्यक्त केला.