कुंडल : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी माझ्यावर जे प्रेम केले आहे, त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी अविरत प्रयत्न करत असतो. आतापर्यंत सांगली जिल्ह्यातील १८० गावांना १९० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. आतापर्यंत हे कधीच झाले नाही. मी राज्यमंत्री म्हणून जरी अर्धा मंत्री असलो, तरी कामे मात्र पूर्ण करतो, असा टोला कृषी व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्ह्यातील माजी मंत्री व विरोधी आमदारांना नाव न घेता लगावला.
कुंडल (ता. पलूस) येथे प्रादेशिक ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना व स्वतंत्र कुंडल ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना या दोन योजनांच्या नूतनीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी मंत्री खोत बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख अरुण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, कडेगाव पंचायत समिती सभापती मंदाताई करांडे, उपसभापती रवींद्र कांबळे, जिल्हा परिषद सदस्या रेश्माताई साळुंखे, सुरेंद्र वाळवेकर, अश्विनी पाटील, नितीन नवले, शांताताई कनुंजे, पलूस पंचायत समिती सभापती सीमा मांगलेकर, उपसभापती अरुण पवार आदी उपस्थित होते.
खोत पुढे म्हणाले, राज्यकर्ते सामान्य माणसांच्या पंगतीला बसतील, तेव्हाच सर्वसामान्यांचे सरकार आले, असे म्हणता येईल. घराणेशाही जपत सामान्य जनतेला समोर ठेवून राजकारण करण्याची प्रथा आता संपुष्टात आली आहे. याचे उदाहरण म्हणजे स्वत: मी आहे. कारण जर मी इतर कोणत्याही पक्षात असतो तर, मला टिकून दिले नसते आणि सामान्य कुटुंबातील व्यक्ती राज्यमंत्री होतो आणि आपल्या लाईनमध्ये बसल्यामुळे अनेकांना गुदगुल्या होतात, हे बºयाचजणांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळे माझ्यावर हल्ले अविरत चालू असतात. जिल्ह्यातील पेयजल योजनांमधील ६० टक्के योजना जुन्या आणि निकामी झाल्या आहेत. पेयजल योजनेमध्ये पूर्वीच्या सरकारने अतिशय भ्रष्टाचार केला आहे.
संग्रामसिंह देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील ही पहिलीच २४ तास आणि ७ दिवस चालणारी पेयजल योजना आहे. यासाठी सहा कोटी ४४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. भविष्यात अजून निधीची आवश्यकता भासल्यास तोही मंजूर केला जाईल.
सरपंच प्रमिला पुजारी यांनी स्वागत केले. क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य किरण लाड यांनी आभार मानले. यावेळी क्रांतीचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, पोपट संकपाळ, पी. एस. माळी, सूर्यकांत बुचडे, बुर्लीचे सरपंच राजेंद्र चौगुले, संदीप पाटील (घोगाव), पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय चिल्लाळ, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्रीप्रसाद बारटके, जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता एस. जी. सादिगले आदी उपस्थित होते.किरण लाड यांच्यामुळेच निधी मंजूर : देशमुखगावातील कॉँग्रेसचे उपसरपंच माणिक पवार व सर्व सदस्य यांनी, या कामाची मंजुरी नाही, वर्कआॅर्डर नाही, असे कारण देऊन या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावर संग्रामसिंह देशमुख म्हणाले, या कामाचे टेंडर तीनवेळा भरले आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वर्कआॅर्डर येण्याची वाट पाहण्याची काहीच आवश्यकता नाही. कार्यक्रमपत्रिकेमध्ये कोणाचे नाव घालायचे आणि कोणाचे नाही, हेही आपल्या हातात नाही. कारण हा कार्यक्रम शासकीय आहे. हा निधी मंजूर झाला आहे, तो केवळ क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड यांच्या पाठपुराव्यामुळे झाला.पृथ्वीराजबाबा, तुम्ही आमदार व्हा...पृथ्वीराजबाबा, तुम्ही आमदार व्हा आणि मला कॅबिनेटमध्ये घ्या, असे सदाभाऊ खोत म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला. सदाभाऊ यांच्या या बोलण्यातून पृथ्वीराज देशमुख विधानसभेची पोटनिवडणूक लढविणार की काय, अशी उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.
सप्टेंबरअखेर शंभर टक्के वीज जोडणीजिल्ह्यातील शेतकºयांनी प्रलंबित वीज कनेक्शन्सचा प्रश्न सदाभाऊ खोत यांच्यासमोर मांडला. यावेळी ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील प्रलंबित सर्व वीज कनेक्शन्सची येत्या सप्टेंबर महिन्यात जोडणी पूर्ण केली जाईल. त्यादृष्टीने निधीचीही शासनाने तरतूद करून तो महावितरणकडे दिला आहे.