शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

 संकटाच्या काळात देवदूत बनून रुग्णांना आधार दिल्याबद्दल सदैव ऋणी : डॉ. अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 7:34 PM

Doctor Day sangli: कोरोना महामारीमध्ये गेल्या दिड वर्षापासून जिवाची बाजी लावून अविरतपणे रुग्णांची सेवा करणारे, खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी महामारीच्या काळात देवदूत बनून रुग्णांची सेवा केल्याबद्दल मानव समाज सदैव आपला ऋणी राहील, अशा शब्दात सर्व डॉक्टरांचे ऋण व्यक्त केले.

ठळक मुद्दे संकटाच्या काळात देवदूत बनून रुग्णांना आधार दिल्याबद्दल सदैव ऋणी : डॉ. अभिजीत चौधरीजिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त् दिल्या शुभेच्छा

सांगली : कोरोना महामारीमध्ये गेल्या दिड वर्षापासून जिवाची बाजी लावून अविरतपणे रुग्णांची सेवा करणारे, खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी महामारीच्या काळात देवदूत बनून रुग्णांची सेवा केल्याबद्दल मानव समाज सदैव आपला ऋणी राहील, अशा शब्दात सर्व डॉक्टरांचे ऋण व्यक्त केले.1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने डॉक्टरांचे ऋण व्यक्त करुन शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, रुग्ण सेवा हीच खरी मानवतेची सेवा मानून कोरोना संकटाच्या काळात अखंड व अविरतपणे सेवा बजावणाऱ्या सर्व डॉक्टर्सचे मी ऋण व्यक्त करतो. कोविडविरुद्धच्या या लढाईमध्ये काही डॉक्टरांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. काहींनी आपले कुटुंबीय गमावले आहेत. घरातील जीवलग व्यक्ती कोविडमध्ये मृत्युमुखी पडल्यानंतरही सर्व दु:ख बाजूला सारुन कोरोना विरुध्दच्या लढाईत ते कर्तव्य बजावत राहिले. या सर्वांच्या योगदानामुळेच आपण महाभयंकर कोरोनाशी यशस्वीपणे लढत आहोत. कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेले योगदान मानव समाज कधीही विसरु शकणार नाही.जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, शासकीय रुग्णालयांत उपचार करणारे असोत अथवा खाजगी रुग्णालयात असोत, प्रत्येकाने आलेल्या प्रत्येक रुग्णाला जीवदान देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-19 हा अदृष्य शत्रू आहे . या शत्रूला मात देण्यासाठी डॉक्टरांचा कस लागत आहे. तरीही हार न मानता या योध्दांनी पहिली कोरोनाची लाट थोपवली. कोरोनाची दूसरी लाट परतीच्या मार्गावर आहे. संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीही जिल्हा प्रशासनाला डॉक्टर्स संपूर्ण साथ देतील.असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :doctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली