शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

मिरजेत १० पासून अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:08 PM

मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, दि. १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ज्येष्ठ बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संगीत महोत्सवात संगीतकार राम कदम पुरस्कार गायक पं. उपेंद्र भट व तबलावादक पं. विठ्ठल क्षीरसागर यांना व डॉ. ...

मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, दि. १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ज्येष्ठ बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संगीत महोत्सवात संगीतकार राम कदम पुरस्कार गायक पं. उपेंद्र भट व तबलावादक पं. विठ्ठल क्षीरसागर यांना व डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार तबलावादक डॉ. खुशबू मदनलाल यांना देण्यात येणार आहे. ‘ताकाहिरो आराई’ या जपानी कलाकाराचे संतुरवादन होणार आहे.दि. १० ते १८ पर्यंत आयोजित अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात पं. राणू मुजूमदार यांचे बासरीवादन, पं. उपेंद्र भट, पं. अर्नब चटर्जी आभा पुरोहित यांचे गायन, डॉ. खुशबू मदनलाल यांचे तबलावादनासह दिग्गज कलाकार गायन-वादन व नीलिमा हिरवे नृत्य सादर करणार आहेत. दि. ११ रोजी मिरजेचे संगीतकार राम कदम पुरस्कार गायक पं. उपेंद्र भट व तबलवादक पं. विठ्ठल क्षीरसागर यांना माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. दि. १२ रोजी विख्यात तबलावादक डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार महिला तबलावादक डॉ. खुशबू मदनलाल यांना धर्मादाय उपायुक्त सुवर्णा जोशी यांच्याहस्ते व उद्योजक जितेनभाई झवेरी यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. रोणू मुजूमदार यांच्या बासरीवादनाने संगीत महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. संगीत महोत्सवात संगीतकार राम कदम यांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम, डॉ. खुशबू मदनलाल यांचे सोलो तबला वादन, पं. अर्नब चटर्जी, कलकत्ता, आभा पुरोहित, पुणे, गायत्री जोशी, पुणे, अमिता गोखले, मुंबई, अनुरत्न रॉय, मुंबई, राजश्री भाटवडेकर, पुणे, मंगला जोशी, सांगली, पं. अलका देव, नाशिक, मीनल नातू, मुंबई, मंजिरी करवे, पुणे, कृष्णा मुखेडकर, बिदर, ऋषिकेश बोडस, मिरज यांचे शास्त्रीय गायन, नीलिमा हिरवे, पुणे यांचे कथ्थक नृत्य, उस्ताद छोटे रहिमत खान, गोवा यांचे सतारवादन, पं. सचिन पटवर्धन, इंदोर यांचे स्पॅनिश गिटारवादन, पं. सुधांशु कुलकर्णी यांचे सोलो हार्मोनियमवादन, कौस्तुभ देशपांडे व सहकाऱ्यांचा आनंदतरंग हा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. संगीत रसिकांसाठी मेजवानी असलेल्या अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचा समारोप गुरुवार, दि. १८ रोजी उद्योजक अरुण दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या उपस्थितीत होणार आहे. मधू पाटील, विनायक गुरव, संभाजी भोसले, डॉ. शेखर करमरकर, बाळासाहेब मिरजकर यांनी संयोजन केले आहे.जपानी कलाकार ताकाहिरो आराई यांचे संतुरवादनमिरजेत १९५४ पासून सुरू असलेल्या अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, फिरोज दस्तूर, अबन मेस्त्री यांच्यासह आंतरराष्टÑीय कीर्तीचे देशातील दिग्गज कलाकार, गायक-वादकांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे. नवरात्र संगीत महोत्सवात गतवर्षी प्रथमच नॅश न्युबर्ट या परदेशी कलाकाराने बासरीवादन केले होते. यावर्षी या जपानी कलाकार ताकाहिरो आराई यांचे संतुरवादन होणार आहे.