शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

आंबेडकरी तत्त्वज्ञान बंदिस्त नको

By admin | Published: March 09, 2016 1:01 AM

रमेश वरखडे : पी. व्ही. पी. महाविद्यालयात चर्चासत्र

कवठेमहांकाळ : आंबेडकर व आंबेडकरवाद ही खूप विस्तीर्ण विचारधारा आहे. समता, न्याय, बंधुता, उपयुक्तता ही लोकशाहीची मूल्ये जपणारी जागतिक स्तरावरची विचारधारा असल्याने देशातील सर्वच स्तरातील साहित्यिकांनी आंबेडकरी तत्त्वज्ञानाला मर्यादित चौकटीत कैद करू नये, असे प्रतिपादन डॉ. रमेश वरखडे यांनी केले. कवठेमहांकाळ येथील पी. व्ही. पी. महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आंबेडकरी साहित्याविषयी दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पहिल्या सत्रातील बीजभाषणात क्रिटिकल इनक्वायटीचे (नाशिक) डॉ. रमेश वरखडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव पवार होते.डॉ. आंबेडकरांना व त्यांच्या साहित्याला आजपर्यंत व्यापक दृष्टीने कोणत्याही साहित्यिकांकडून पाहिले गेले नाही. त्यांना कायमच दलितांच्या चौकटीत बसविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. आंबेडकरवाद हा जगाला उपयुक्त आहे. आंबेडकरी लेखकांनीही आता कात टाकली पाहिजे व डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचा विस्ताराने अभ्यास करून मर्यादेच्या सीमा तोडणे गरजेचे असल्याचे वरखडे यांनी सांगितले.हिंदू संस्कृतीला सबळ पर्याय उभारण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर केले व जुलमी प्रथांना ठोकरले. मात्र दलित साहित्यातून, लेखणीतून सयाजीराव गायकवाड दुर्लक्षित झाल्याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.प्रमुख पाहुणे विजयराव सगरे म्हणाले, समाजामध्ये माजलेली विषमता दूर करण्यासाठी व उपेक्षित, वंचित, दलितांना स्वाभिमानाचे, स्वातंत्र्याचे जगणे देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची वाट धरली. तसेच वर्षानुवर्षे जातीवाद, धर्मवाद जोपासणारी मंडळीच आज सत्तेवर असल्याचे परखड मत त्यांनी मांडले. प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांनी, सामाजिक परिस्थितीवर उपहासात्मक टीका केली. या चर्चासत्रावेळी पहिल्या व दुसऱ्या सत्रात आंबेडकरवादी साहित्यावर विविध अभ्यासकांनी शोधनिबंध सादर केले. मराठी कथेवर प्रा. जी. के. ऐनापुरे, डॉ. प्राची गुर्जरपाध्ये, डॉ. शोभा नाईक, प्रा. माधुरी देशमुख यांनीही शोधनिबंध सादर केले. या चर्चासत्रप्रसंगी प्रा. अविनाश सप्रे, डॉ. नंदकुमार मोरे, संतोष कोळी, डॉ. शिवाजी पाटील, विशाल शिंदे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. मंगला वरखडे, संस्थेचे सचिव प्रा. जे. वाय. भोसले यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. आप्पासाहेब कोळेकर यांनी केले. (वार्ताहर)