शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

Sangli- कृष्णा नदीपात्रात महिला तरंगताना आढळली; पोलिस अन् एक युवक पाण्यात उतरला, तोच..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 5:33 PM

सांगलीत घडला हॉरर सिनेमाला शोभावा असा प्रसंग

शरद जाधवभिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे कृष्णा नदीपात्रात पांढऱ्या साडीतील एक महिला पडलेली ग्रामस्थांना दिसली. काहींनी याची माहिती पाेलिसांना दिली. एक पोलिस तत्काळ नदीकाठावर आला. एका युवकासाेबत नदीकाठावर गेला. हा नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी दाेघेही पाण्यात उतरतात. पाण्यात तरंगणाऱ्या महिलेजवळ जाऊन अंदाज घेऊ लागतात. पुढे हाेऊन तिचे हात पकडतात, अन् ती ताडकन उठून चालू लागते...एखाद्या हॉरर सिनेमाला शोभावा असा प्रसंग.. प्रत्यक्षदर्शी क्षणभर भंबेरीच उडाली. भिलवडी-अंकलखोपदरम्यानच्या पुलावरून कुणीतरी तयार केलेला या घटनेचा १ मिनिट ५३ सेकंदांचा व्हिडीओ सायंकाळी समाजमाध्यमांवर जाेरदार व्हायरल झाला. प्रत्येकजण  फाेनाफाेनी करून हा प्रकार नेमका काय आहे याबाबत विचारणा करू लागला. मात्र, व्हिडीओमधील प्रसंगाची कुणालाच उकल झाली नाही.त्याचे झाले असे, शनिवार दि. १ एप्रिल रोजी रात्रीनंतर अंकलखोप-भिलवडीदरम्यान असलेल्या पुलाजवळ भिलवडीच्या बाजूला कृष्णा नदीत एक महिला तरंगताना काहींनी पाहिली. अंकलखोप गावच्या बाजूने कुण्या महिलेचा मृतदेह वाहत येऊन तो भिलवडी पुलाच्या खालून घाटाच्या बाजूला तरंगत असल्याची माहिती भिलवडी पोलिसांत काहींनी दिली. पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ नदीपात्राकडे धाव घेतली. गुडघाभर पाण्यात एक वृद्ध महिला तरंगताना त्यांना दिसली. नेमका काय प्रकार असावा असा अंदाज घेत दाेघे पुढे झाले. एखादा मृतदेहच असावा, अशा शक्यतेने त्यांनी त्या महिलेचे हात पकडून नदीकाठाकडे ओढत नेले. मात्र, पाण्याबाहेर काढण्यापूर्वीच ती वृद्धा चटकन उठली आणि चालू लागली. भिलवडी पुलावरून कोणीतरी या प्रसंगाचा व्हिडीओ तयार केला. ताे चांगलाच व्हायरल झाला. कोणी संबंधित महिला आत्महत्या करायला गेली असावी, कोणी ती पाण्यात पाय घसरून पडली असावी असा अंदाज व्यक्त केला. तर काहींना हा चमत्कार वाटला. एवढा वेळ ती पाण्यामध्ये काेणतीही हालचाल न करता तरंगत कशी राहिली? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करीत हाेते.आजीबाई माहेरात.. नेटकरी टेन्शनमध्ये..घटनेनंतर आजीबाई भिलवडीशेजारी असणाऱ्या एका गावात आपल्या माहेरी जाऊन निवांत राहिल्या आहेत. मात्र, नेटकरी टेन्शनमध्ये आहेत. आजीबाईंनी आपण पाण्यात पाय घसरून पडल्याची माहिती दिल्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी