सांगली : अयोध्येतील राममंदिराची प्रतिष्ठापना ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासन १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून देणार आहे. जिल्ह्यातील चार हजार १२ हजार २८३ रेशन कार्डधारकांना दि. २२ ते २९ जानेवारी २०२४ या कालावधीत आनंदाचा शिधा वाटप होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.अयोध्येतील राममंदिराची प्रतिष्ठापना ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासन १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून देणार आहे. जिल्ह्यातील चार लाख १२ हजार २८३ रेशनकार्डधारक लाभार्थी कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे. सोमवारपासून या किटचे वाटप सुरू होणार आहे.
दिवाळीच्या धर्तीवर वितरित केल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिधा किटमध्ये प्रत्येकी एक किलो साखर व पामतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा व पोह्यांचा समावेश असेल. २९ फेब्रुवारीपर्यंत वाटप पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार तीन ते चार दिवसांपासून तालुक्यांना एक-एक वस्तू उपलब्ध होण्यास प्रारंभ झाला आहे. सर्व तालुक्यांमध्ये किटमधील सहाही वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्याचे लाभार्थ्यांना वितरण होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बारकुल यांनी दिली.
जिल्ह्यातील आनंदाचा शिधाचे पात्र लाभार्थीतालुका - रेशन कार्डधारकमिरज - १०१५८७क. महांकाळ - २४०७२जत - ५२९४२आटपाडी - २३१८०कडेगाव - २५५४०खानापूर - २७५८८तासगाव - ४२१७२पलूस - २८१२६वाळवा - ६०७००शिराळा - २६३७६एकूण - ४१२२८३