शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
2
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
3
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
4
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
5
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
6
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
7
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
8
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
9
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
10
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
11
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
12
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
13
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
14
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
16
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
17
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
18
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
19
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
20
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

अनिल लाडच्या चौकशीतून कोथळे खुनाचा उलगडा, उपअधीक्षक पाटील यांची साक्ष

By शीतल पाटील | Published: September 12, 2022 9:09 PM

चौकशीत घटनास्थळ, मृतदेह दाखवला

सांगली : अनिकेत कोथळे खून प्रकरणात अनिल लाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या चौकशीतून खुनाचा उलगडा झाला. त्याने अनिकेतला जाळलेले ठिकाणही दाखविल्याची साक्ष तत्कालीन पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सोमवारी न्यायालयात दिली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपास घेतला.सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ६ नोव्हेंबर २०१७ ला संशयित अनिकेत कोथळे याचा खून करण्यात आला. खुनानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात जाळण्यात आला होता. या खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, वाहनचालक राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले आदी संशयित आहेत. एक संशयित हवालदार अरुण टोणे याचा आजाराने कारागृहातच मृत्यू झाला आहे.सोमवारी तत्कालीन उपअधीक्षक धीरज पाटील यांची साक्ष नोंदविण्यात आली. ते म्हणाले, पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार निरीक्षक राजन माने यांच्याकडून तपास हाती घेतला. त्यावेळी संशयित अनिल लाड याला समक्ष हजर केले. गुन्ह्याविषयी चौकशी करून पंचांसमक्ष अटक केली. राजन माने यांना उर्वरित आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. लाड याला गुन्ह्यासंदर्भात विश्वासात घेऊन माहिती घेतली. त्यावेळी त्याने कोथळे याचा मृतदेह चारचाकीमधून महादेवगड डोंगरात नेला व त्याठिकाणी मृतदेह जाळल्याचे सांगितले. त्यानुसार घटनास्थळी पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला.साक्षीदार पाटील यांचा ॲड. निकम यांनी सरतपास घेतल्यावर बचाव पक्षाचे ॲड. विकास पाटील-शिरगावकर, ॲड. गिरीश तपकिरे, ॲड. प्रमोद सुतार यांनी उलट तपास सुरू केला. जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, ‘सीआयडी’चे तत्कालीन उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक मनोज बाबर यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी