शासनाच्यावतीने १ ते ३० सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय महापोषण अभियान म्हणून राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अंजनी येथे अंगणवाडी क्रमांक १९२ मध्ये कार्यक्रम पार पडला. आमदार सुमनताई पाटील अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी उपकेंद्राच्या डॉ. अश्विनी पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, तसेच अंजनीच्या सरपंच स्वाती पाटील, निरीक्षक पी. आर. पाटील उपस्थित होत्या. पी. आर. पाटील यांच्याहस्ते आमदार सुमनताई पाटील व सरपंच स्वाती पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांनी राष्ट्रीय महापोषण अभियानाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमास अंगणवाडी सेविका जयश्री चव्हाण, मंगल सावळे, सुनंदा पवार, प्रतिभा खिलारे व सर्व मदतनीस उपस्थित होत्या. राजश्री पाटील यांनी आभार मानले.