आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे डी फार्मसी महाविद्यालयाच्या डिप्लोमा विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे अशी माहिती प्राचार्य सुजित देसाई यांनी दिली. महाविद्यालयात द्वितीय वर्षात सुशांत गावडे ९४.८० टक्के, तेजश्री वाईनगडे ९३.३० टक्के, कोमल चौगुले ९१.७० टक्के यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
पदवी विभागांतर्गत डिप्लोमामध्ये प्रीतम कुंभार ९६.३० टक्के, ऋतुजा चौगुले ९६.२० टक्के व ओंकार जासुद ९५.१० टक्के यांनी यश संपादन केले. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, सचिव ॲड. राजेंद्र डांगे यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, रजिस्ट्रार प्रा. शैलेंद्र हीवरेकर, प्राचार्य महेश सरलया व सुजित देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.