शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

सरकारी कर्मचाऱ्यांचा वार्षिक सभेत गोंधळ

By admin | Published: July 20, 2014 11:33 PM

‘सॅलरी’ची सभा : नोकरभरतीसह सर्व ठराव बहुमताने मंजूर; सत्ताधाऱ्यांवर विरोधकांची टीका

सांगली : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदाही प्रचंड गोंधळ झाला. गोंधळातच सत्तारुढ गटाने ‘मंजूर...मंजूर’, अशा घोषणा देत नोकरभरतीसह सर्व ठराव मंजूर केले. सत्ताधारी गटाने कोणालाही बोलण्याची संधी न देता ही सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधकांनी केला. येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दि सॅलरी अर्नर्स सोसायटीची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कदम होते. सहकार कायदा कलम ८९ नुसार संस्थेच्या कारभाराची चौकशी झाली असून, त्यात अनियमिततेबरोबर अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत, अशी टीका सभेपूर्वीच छोटुराव देशमुख, बी. बी. लाड, तात्या कुलकर्णी, नंदू ढोबळे, बजरंग कदम, दिलीप शिंदे यांनी केली होती. यामुळे सभेत गोंधळ होण्याची शक्यता गृहित धरुन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी स्वागत केल्यानंतर सत्तारूढ व विरोधी सदस्यांकडून गोंधळास प्रारंभ झाला. प्रथम प्रश्नोत्तरे घेण्यात यावीत, अशी मागणी बजरंग कदम यांनी केली. मात्र याला सत्तारुढ गटाने विरोध करुन, नियोजित पध्दतीनेच सभेचे कामकाज करण्यात येईल असे स्पष्ट केले. यानंतर काही विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. यानंतर राखीव निधी, मृत फंड, कल्याण निधी, विद्यार्थी बक्षीस योजना, जीवन रक्षक निधी, विमा क्लेम, ठेव तारण कर्जे आदी ठरावांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर पोटनियम दुरुस्ती, लेखापरीक्षक नेमणे, नवीन नोकर भरतीसाठीही सभेची मान्यता घेण्यात आली. सभागृहात गोंधळ सुरू असतानाच ठरावांना मंजुरी दिली जात होती. एकीकडे मंजूर, तर दुसरीकडे नामंजूर अशा घोषणा सुरूच राहिल्या. सभासदांसाठी ठेवण्यात आलेला ध्वनिक्षेपकाचा ताबा घेण्यासाठी सत्तारुढ व विरोधकांमध्ये झटापट झाली. विरोधकांनी शेवटी सभागृहातून बाहेर पडणेच पसंत केले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मलगोंडा कोरे, संचालक सदाशिव सूर्यवंशी, सौ. सुचेता हरळीकर, सौ. सुमन थोरात, अरुण गायकवाड, सुनील ढाले, सत्तारुढ गटाचे नेते डी. जी. मुलाणी, पी. एन. काळे, इकबाल मुलाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)--संस्थेची बदनामी करुन ठेवीदारांमध्ये घबराट निर्माण केल्याबद्दल विरोधी गटात गेलेले संचालक सुकुमार पाटील, रामराव मोडे यांच्यासह सभासद छोटुराव देशमुख, बी. बी. लाड, तात्या कुलकर्णी, नंदू ढोबळे, बजरंग कदम आदींना नोटिसा पाठविण्यासही सभेत मान्यता घेण्यात आली. त्यांना रितसर नोटिसा पाठवून विशेष सभा बोलावून त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष प्रदीप कदम यांनी दिली. --सत्तारुढ गटाने गोंधळ घालून केवळ अर्ध्या तासातच सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधक छोटुराव देशमुख, नंदू ढोबळे, बजरंग कदम, तात्या कुलकर्णी आदींनी केला. विरोधकांना बोलू दिले नाही, ध्वनिक्षेपक दिला नाही, प्रश्न विचारण्यास गेले असता गोंधळ घालून त्यांना रोखण्यात आले. सभासदांचा हक्क आजच्या सभेत डावलण्यात आल्याचे ते म्हणाले. सत्तारुढ गटाचे नेते डी. जी. मुलाणी म्हणाले की, पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांची धडपड ही केविलवाणी होती. त्यांच्याकडे कोणताही नवा मुद्दा नव्हता. जुन्याच प्रश्नांना ते ऊत आणत होते.