इस्लामपूर : राज्य सरकार प्राथमिक शिक्षणाची आपली जबाबदारी झटकत आहे. त्यांचा खासगीकरणाकडे झुकणारा कल चिंताजनक आहे, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले. पुढील तीन वर्षात काय-काय सुधारणा करायच्या, याचे नियोजन करून आपली शाळा ‘सर्वोत्तम शाळा’ बनवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
साखराळे (ता. वाळवा) येथील मॉडर्न हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात आ. पाटील बोलत होते. कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सदस्य टी. ए. चौगुले, सचिव आर. डी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, सरपंच बाबूराव पाटील, मुख्याध्यापक आर. आर. बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव करण्यात आला.सचिव आर. डी. सावंत म्हणाले, गावाचा सरपंच जर चांगला असेल, तर गावाची प्रगती होते. तसेच शाळेचा मुख्याध्यापक चांगला असेल, तर शाळेची उत्तम वाटचाल होते. मात्र सेवाज्येष्ठतेमुळे बºयाचवेळा चुकीच्या व्यक्तीची निवड झाल्याने शाळांचे नुकसान झाले आहे. इंग्रजी शाळा व खासगी क्लासेसच्या आव्हानांना तोंड देतच पुढे जावे लागते. बापूंनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजप्रमाणे आमच्या खेडेगावातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून ४0-४२ वर्षापूर्वी या शाळेची स्थापना केली आहे.
यावेळी टी. ए. चौगुले यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर मुख्याध्यापक आर. आर. बडवे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा. कृष्णा मंडले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सौ. ए. डी. थोरात यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल मांडला.
याप्रसंगी संस्थेचे अधीक्षक एस. बी. टोणपे, बाळासाहेब पाटील, शहाजी पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, अविनाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य उमेश रासनकर, सतीश सूर्यवंशी, मधुकर जाधव, एस. बी. साठे, सौ. संगीता पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सौ. अर्चना ढवळीकर यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. आर. मोरे यांनी आभार मानले.पालकांची : समजूतजयंत पाटील म्हणाले, आपला मुलगा इंग्रजी शाळेत शिकला तर त्याचे भवितव्य अधिक उज्ज्वल घडू शकते, अशी पालकांची समजूत झाली आहे. आसपासच्या शाळांमध्ये आपल्यापेक्षा काय जादा दिले जाते, याचा अभ्यास करून ते आपल्या शाळांमध्ये देण्याचा प्रयत्न करा. दहावीच्या मुलांची गुणवत्ता वाढविणे, मुलांना खेळात पारंगत करणे आणि पालकांच्या समाधानाचा इंडेक्स वाढविण्यावर भर द्या.साखराळे (ता. वाळवा) येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात आमदार जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शामराव पाटील, आर. डी. सावंत, टी. ए. चौगुले, प्राचार्य राजेंद्र कुरळपकर उपस्थित होते.