शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

अ‍ॅपेक्समधील मृत्यूप्रकरण सीबीआयकडे नेणार : आशिष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 6:46 PM

Ashish Shelar Bjp Sangli : मिरजेच्या अ‍ॅपेक्स रुग्णालयातील ८७ रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर असून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. लवकरच याप्रश्नी भाजप सीबीआयकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते आ. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअ‍ॅपेक्समधील मृत्यूप्रकरण सीबीआयकडे नेणार : आशिष शेलारदबावतंत्र चालू देणार नाही, भाजप प्रसंगी न्यायालयात जाईल

सांगली : मिरजेच्या अ‍ॅपेक्स रुग्णालयातील ८७ रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर असून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. लवकरच याप्रश्नी भाजप सीबीआयकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते आ. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.शेलार म्हणाले की, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या आयुक्तांची याप्रकणी भूमिका संशयास्पद आहे. या रुग्णालयाच्या परवानगीपासून अनेक गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत, अशी माहिती मला भाजप कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे. दुसरीकडे हे प्रकरण दाबण्याच्या दृष्टीने पत्रकारांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्याचा भाजपच्यावतीने आम्ही निषेध करीत आहोत. ही मुस्कटदाबी आम्ही सहन करणार नाही.भाजपने हे प्रकरण बाहेर काढले असून ते तडीस नेऊ. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार होतो, मात्र विधानसभा चालू दिली नाही. आता हे प्रकरण आम्ही सीबीआयकडे नेणार आहोत. प्रसंगी न्यायालयातही दाद मागू. यात जे कोणी दोषी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही.जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. या सरकारने व त्यांच्या जिल्ह्यातील मंत्र्यांनी यात लक्ष घालायला हवे. केवळ गैरनियोजनामुळे रुग्ण, मृत्यूसंख्या वाढत आहे. लोकांच्या जिवाचा हा प्रश्न असल्याने सरकारने याबाबतीत गांभिर्याने पावले टाकावीत.जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकारणाबद्दल ते म्हणाले की, पक्षाचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. मत मांडण्यामुळे पक्षात फार मोठी गटबाजी आहे, असा अर्थ घेऊ नये.संभाजीराजेंना आमचा पाठींबाचछत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेला आमचा पाठींबा आहे. ते आमचे राजे आहेत. समाजाच्या आरक्षणप्रश्नी ते जे भूमिका घेतील, त्याला आमचे सहकार्य राहील, असे शेलार यांनी स्पष्ट केले.आरक्षण घालविण्यामागे वोट बँकेचा अजेंडामराठा समाजाचे आरक्षणप्रश्नी ठाकरे सरकारची भूमिका चुकीची आहे. भाजपला श्रेय मिळू नये व त्यांची वोट बँक सुरक्षित रहावी, असा त्यामागे छुपा अजेंडा होता, अशी टीका शेलार यांनी यावेळी केली.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाSangliसांगली