शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 6:08 PM

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची मतमोजणी, विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 3 जून 2019 अखेर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागूमतमोजणीच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

सांगली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची मतमोजणी, विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 3 जून 2019 अखेर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई केली आहे.

मनुष्य अगर प्रेत अगर त्याच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, अर्वाच्य गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला निदर्शने करणे, ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 20 मे 2019 रोजीच्या 10.00 वाजल्यापासून लागू झाला असून तो दिनांक 3 जून 2019 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.मतमोजणीच्या ठिकाणी मनाई आदेश जारी सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी मतदान झाले आहे. या मतदानाची मतमोजणी दिनांक 23 मे 2019 रोजी सेन्ट्रल वेअर हौसिंग कॉर्पोरेशन, मिरज येथे होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी याकरीता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील सेन्ट्रल वेअर हौसिंग कॉर्पोरेशन, मिरज इमारतीपासून 200 मिटर सभोवतालच्या परिसरात मनाई आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटा-गटाने फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई करण्यात आली आहे. झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक या संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रात परवानगी शिवाय मोबाईल, पेजर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश दिनांक 23 मे 2019 रोजीचे सकाळी 06.00 वाजल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsangli-pcसांगली