मिरज : घरांसाठी ९० चौरस मीटरच्या आत व मुंबईसह सहा महानगरात ६० चौरस मीटरच्या आत व ४५ लाख मूल्यांकनापेक्षा कमी किमतीच्या निवासी घरांसाठी जीएसटीत १ टक्क्यापर्यंत कपात करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून छोट्या घरांसाठी १ टक्का व त्यावरील जादा किमतीच्या घरांसाठी ५ टक्के जीएसटी दराची अंमलबजावणी सुरु झाली आहे.केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाने परवडणाऱ्या घरांसाठी जीएसटीचे नवीन दर अधिसूचित केले आहेत. १ एप्रिलपासून कमी किमतीच्या घरांसाठी प्रभावी दर १ टक्का, इतर निवासी घरांवर ५ टक्के, तर दुकाने व कार्यालयांसाठी १२ टक्के कर भरावा लागणार आहे. नवीन कर आकारणीचा लाभ घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना रोख स्वरुपात कर भरावा लागेल.१२ टक्के दराने जीएसटी भरणाºया बांधकाम व्यावसायिकांना सळई, सिमेंट, मजुरी व बांधकाम साहित्यावरील भरलेल्या कराचा परतावा मिळणार आहे. नवीन दराचा लाभ घेणारे व्यावसायिक कर परतावा घेण्यास पात्र असणार नाहीत.अधिसूचनेतील तरतुदीनुसार १ एप्रिल २०१९ रोजी चालू असलेल्या गृह प्रकल्पाच्या बाबतीत, नोंदणीकृत बांधकाम व्यावसायिक नवीन १ व ५ टक्के या दरानेच जीएसटीचा भरणा करू शकतात किंवा जुन्या १२ व ८ टक्के दराने जीएसटी भरण्याचा पर्याय वापरू शकतात. जुन्या दराचा पर्याय स्वीकारणारे व्यावसायिक परतावा घेण्यास पात्र राहतील; मात्र त्य़ांनी कोणता पर्याय निवडला, हे दि. २० मे पर्यंत जीएसटी विभागास कळविणे आवश्यक आहे. जीएसटी दराचा पर्याय न निवडल्यास नोंदणीकृत व्यावसायिकांना निवासी घरांवर १ व ५ टक्के दरानेच भरणा करावा लागेल.निवासी संकुलांतील व्यापारी गाळ््यांबाबत नियमदि. १ एप्रिल २०१९ नंतर चालू होणाºया प्रकल्पाच्या बाबतीत मात्र, बांधकाम व्यावसायिक नवीन १ व ५ टक्के दरानेच जीएसटीचा भरणा करू शकणार आहेत. निवासी संकुलात १५ टक्के व्यापारी गाळे असल्यास अशा व्यावसायिक क्षेत्रासाठी १५ टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याचे जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नव्वद चौरस मीटरपर्यंतच्या घरांना एक टक्का जीएसटी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:18 PM