शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

ऊस शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी समितीची नियुक्ती, साखर आयुक्तांची कार्यवाही; दोन महिन्यांत अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 12:42 PM

गेल्या काही वर्षांत ऊसशेतीला लागलेल्या अशा मानवी किडीमुळे शेतकरी त्रस्त

सांगली : ऊसतोडणीमध्ये शेतकऱ्यांची लूट, मजूर पुरविण्याच्या बहाण्याने लाखो रुपये घेऊन गायब होणे, ऊसतोड टोळीसाठी कारखान्याच्या स्लिपबॉयला चिरिमिरी देणे, अशा प्रकारांनी ऊस उत्पादक शेतकरी गांजून गेला आहे. त्यावर उपायांसाठी साखर आयुक्तालय सरसावले आहे. या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती केली आहे.गेल्या काही वर्षांत ऊसशेतीला लागलेल्या अशा मानवी किडीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. मजुरांनी बक्षिसी मागणे, वाढ्यावर हक्क सांगणे, ऊस मुळापासून न तोडणे, असे प्रकार रूढ झाले आहेत. ऊस पेटविणे, जळालेला ऊस तोडण्यास नकार देणे किंवा जादा पैसे मागणे, असे प्रकारही चालतात.वाहतुकीसाठी शेतकऱ्याकडेच ट्रॅक्टर मागणे, मटण, दारू, पैशाची मागणी, शेतात तण असल्यास ऊसतोडीला नकार देणे, शेतातून बांधावरील वाहनापर्यंत ऊस नेण्यासाठी जादा पैसे मागणे, अशा छळवणुकीने शेतकरी हैराण आहेत. भीक नको; पण कुत्रे आवर, अशी अवस्था झाली आहे. टोळ्यांना सर्व कामांसाठी कारखान्यांकडून पैसे अदा केले जातात, तरीही अडवणूक केली जाते. लवादाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा पैसे घेतले जातात.यासंदर्भात शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी, कारखाने व शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी साखर आयुक्तालयाकडे दाखल झाल्या आहेत. त्यावर उपाय शोधण्यासाठी समिती नियुक्त केली आहे.अभ्यास गट उपाययोजनांबाबत कामकाज करणारआयुक्तालयातील प्रशासकीय संचालक तिचे अध्यक्ष आहेत. सदस्यांमध्ये प्रादेशिक सहसंचालक, कारखान्यांचे कार्यकारी संचालक, शुगर मिल्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक, ऊस नियंत्रण मंडळाचे दोन शेतकरी प्रतिनिधी, वाहतूकदार संस्थेचा प्रतिनिधी, पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राचा प्रतिनिधी यांचा समावेश आहे. सदस्य सचिव म्हणून साखर आयुक्तालयातील सहसंचालक काम पाहतील. अभ्यास गटाने दोन महिन्यांत उपाययोजनांचा अहवाल सादर करायचा आहे. आयुक्त शेखर गायकवाड यांनी समिती नियुक्त केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने