ते म्हणाले, क्रांती कारखान्याचे घोगाव येथील विभागीय कार्यालय अज्ञातांनी पेटविले. त्यानंतर लाड यांनी आमच्यावर टीका केली. कडेगाव येथे दि. १८ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत क्रांती कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी उपस्थित होते. त्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले होते. लाड यांना विचारल्याशिवाय जोशी यांनी आम्हाला दिला होता का? पदवीधर निवडणूक जिंकण्यासाठी खोटे आश्वासन दिले होते का, यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एकरकमी एफआरपी दिली पाहिजे. याबद्दल साखर आयुक्तांकडे आम्ही तक्रार करणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांच्यामुळेच उसाचा ३०० रुपयांचा दर तीन हजारांवर गेला, हे राज्यातील शेतकरी जाणतात. यासाठी कोणत्याही साखर सम्राटांच्या प्रमाणपत्राची गरज नाही.
पदवीधरच्या निवडणुकीनंतर अरुण लाड यांनी शब्द फिरविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:22 AM