ओळ : पुनदी (ता. पलूस) येथे आमदार अरुण लाड यांनी पूर स्थितीचा आढावा घेतला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
पलूस : आमदार अरुण लाड यांनी शुक्रवारी पलूस तालुक्यातील पूर स्थितीचा आढावा घेतला. काय हवे, काय करावे लागेल यासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
तालुक्यातील वसगडे, भिलवडी, आमनापूर, बुर्ली, पुनदी, नवी पुनदी, दुधोंडी, तुपारी या गावातील ज्या भागात पुराचे पाणी आले आहे तेथील लोकांची विचारपूस केली. त्यांच्या अडचणी समजून घेऊन लवकरात लवकर मदत पोहोचेल असे आश्वासन दिले. नागरिकांनी आपले पशुधन घेऊन सुरक्षित स्थळी जाण्यासाठी तयारी करावी, कोणीही पाणी पातळी वाढण्याची वाट बघू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आढाव्यानंतर क्रांती कारखान्यावर कार्यकर्त्यांना बोलावून पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकाला आवश्यक गोष्टींचा पुरवठा करण्याबाबत तसेच त्यांना सुरक्षित ठिकाणी पाेहाेचविण्यासाठी यंत्रणा उभारण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रशासनालाही मदत व बचाव कार्याबाबत सूचना केल्या.
230721\20210723_125834.jpg
अरुण लाड आढावा