‘अरुण लाड आगे बढो’च्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता. यावेळी
अरुण लाड यांच्या विजयात बहुमोल योगदान दिलेले कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचाही कार्यकर्त्यांनी जयघोष केला. कडेगाव, शहरासह तालुक्यात गावोगावी कार्यकर्त्यांनी एकत्र जमून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.
पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असताना, महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी ४८ हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयश्री मिळविल्याने या बालेकिल्ल्यास मोठे भगदाड पाडण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे.
चौकट :
विश्वजित कदम यांनी शब्द पळाला
मागीलवर्षी विधानसभा निवडणुकीत लाड गटाने कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना सहकार्य केले होते. त्यावेळी विश्वजित कदम यांनी दिलेला शब्द यावेळी पदवीधर निवडणुकीत पाळला. यामुळे आता कदम-लाड गटातील मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत रंगत होती.
फोटो: 04kadegaon01
फोटो ओळ :
महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयानंतर कडेगाव येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.