ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कृषिमंत्री विश्वजित कदम व आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मोठ्या विश्वासाने अरूण लाड व जयंत आसगावकर यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रामाणिक प्रयत्न करत दोन्ही उमेदवारांना निवडून आणले. आमदार अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या विजयाने पदवीधर व शिक्षक मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीमुळे भाजप पिछाडीवर जात असल्याचे चित्र पूर्ण महाराष्ट्रात आहे.
यावेळी युवक तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष फिरोज मुल्ला, तालुका उपाध्यक्ष शिवलिंगप्पा पाटील, नेते महांतेश पाटील, सरपंच राजू पाटील, रवी शिवपुरे, उपसरपंच बाबू नागौड आदी उपस्थित होते.