शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

सांगली जिल्हा परिषदेत मिळाली तब्बल 'साडेसहा हजार किलो'ची रद्दी, कालबाह्य कागदपत्रांची विल्हेवाट लावणार

By संतोष भिसे | Published: December 28, 2023 6:33 PM

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील तब्बल ६५ टन कालबाह्य कागदपत्रे बाजुला काढण्यात आली आहेत. त्यांची विल्हेवाट लावली ...

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील तब्बल ६५ टन कालबाह्य कागदपत्रे बाजुला काढण्यात आली आहेत. त्यांची विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.प्रशासकीय कामकाजात गतिमानतेसाठी विभागीय आयुक्तांनी पावसाळी अभियान उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सर्व विभागांतील अभिलेख्यांचे वर्गीकरण करण्यात आले. यामध्ये सुमारे ६५ टन मुदतबाह्य कागदपत्रे आढळली. ती व्यवस्थितपणे नष्ट करण्याचा आदेश संबधित विभागांना देण्यात आले आहेत. कालबाह्य फायलींचे अ, ब, क व ड या प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. कडेगावमध्ये ५५० किलो, मिरजेत १०१५ किलो, तासगावमध्ये १०४५ किलो, खानापुरात ५०७ किलो, आटपाडीत १८५८ किलो, कवठेमहांकाळमध्ये २३४५ किलो, जतमध्ये १९७१ किलो, शिराळ्यात ५३४८ किलो, वाळव्यात २६९१ किलो आणि पलूसमध्ये २४४४ किलो निरुपयोगी कागदपत्रे आढळली.  जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाकडे २७० किलो, समाजकल्याणमध्ये २०० किलो, पशुसंवर्धनमध्ये २००० किलो, प्राथमिक शिक्षणमध्ये ३६४० किलो, कृषी विभागात ५६० किलो, जलसंधारणमध्ये १०६ किलो, बांधकाम विभागात ८०० किलो, महिला व बालकल्याण विभागात ४० किलो, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेकडे ८८ किलो, आरोग्य विभागात १६१५ किलो आणि माध्यमिक शिक्षणमध्ये १५० किलो कागद आढळले. या स्वच्छता मोहिमेमुळे नवी कागदपत्रे ठेवण्यास जागा उपलब्ध होणार आहे. आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध होऊन वेळेची बचत व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद