शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

भावाचा नादच खुळा! भाऊ उपसरपंच झाला पठ्ठ्याने हेलिकॉप्टरने उधळली फुले

By हणमंत पाटील | Published: December 02, 2023 2:37 PM

गत महिन्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साहेबराव खिलारी करगणी ग्रामपंचायतसाठी सदस्य म्हणून निवडून आले.

आटपाडी : भाऊ गावचा उपसरपंच झाल्याने धाकट्या भावाचा आनंद गगनात मावेनासा झाला. २० वर्षांपूर्वी केलेला ‘पण’ लक्षात होता. त्यानुसार थेट हेलिकॉप्टरमधून गावाला रपेट मारत ग्रामदैवतेला प्रदक्षिणा घालत फुले उधळून आनंद व्यक्त केला. आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील या जल्लोषाची राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा रंगली आहे.

साहेबराव खिलारी यांची करगणी गावच्या उपसरपंचपदी निवड झाली. धाकटा भाऊ अंकुश खिलारी याला खूप आनंद झाला. आपल्या कुटुंबीयांनी गावच्या उपसरपंचपदाचे पाहिलेले कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला. हा आनंदा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यातूनच थेट गावाला हेलिकॉप्टरमधून फेरफटका मारून आनंद व्यक्त केला आहे. गावाला फेरफटका मारत ग्रामदैवत लखमेश्वर ऊर्फ राम मंदिराच्या शिखराला प्रदक्षिणा घातली.

गत महिन्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साहेबराव खिलारी करगणी ग्रामपंचायतसाठी सदस्य म्हणून निवडून आले. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पॅनलने करगणी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडवले. दोन दिवसांपूर्वी उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या खिलारी यांची निवड झाली. या निवडीचा भाऊ अंकुश याला मोठा आनंद झाला. त्यातूनच चक्क हेलिकॉप्टरमधून रपेट करत बंधुप्रेम दाखवले. 

२० वर्षांपूर्वी केला पण ...खरे तर २० वर्षांपूर्वी अंकुश खिलारी यांचे चुलते दुर्योधन खिलारी यांची राजकीय डावपेचातून पदाची संधी हुकली होती. त्यावेळी अंकुश यांनी कुटुंबातील कोणताही सदस्य गावचा सरपंच, उपसरपंच झाल्यास संपूर्ण गावाला व ग्रामदैवत श्रीराम मंदिराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालण्याचा पण केला होता. तो भावाच्या उपसरपंचपदानंतर पूर्ण केला. त्यासाठी लाखो रुपये खर्चही केले.

निवडणूक आणि फेरफटका चर्चेत

करगणी ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. येथील निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले. अनेकांनी पाण्यासारखा पैसा ओतला. त्यामुळे निवडणुकीची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता हेलिकॉप्टरमधून फेरफटका मारल्याची चर्चा रंगली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSangliसांगली