शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

अपहाराच्या रकमेवर ऐश...

By admin | Published: December 03, 2015 11:24 PM

वसुलीकडे दुर्लक्ष : दीड कोटी रुपये वसूल कधी होणार--घोटाळे करा बिनधास्त राहा-३

अशोक डोंबाळे -- सांगलीरिकामे डांबरी बॅरेल, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, तसेच जिल्हा परिषद भांडार विभाग यामध्ये अपहार करून दीड कोटीचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हडप केला आहे. हा अपहार १९८९ ते २०१३ या आर्थिक वर्षातील असून, २७ वर्षांमध्ये अपहाराची रक्कम वसूल झाली नाही. या अपहाराशी संबंधित काही कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त, तर काही मृत झाले आहेत. अनेकजण सेवेत असून, शासकीय निधीवर डल्ला मारूनही निश्चिंत आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणात अपहाराच्या रकमेकडे गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनीही कधी गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे, ते अपहार करूनही उजळमाथ्याने वावरत आहेत.कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी तसलमात निधीतून १९६६ मध्ये २५ हजार ८६९ रुपयांचा अपहार केला आहे. या अपहारास ४९ वर्षे झाली असून, ती रक्कम आजअखेर वसूल झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या भांडार विभागामध्ये वस्तूंच्या स्वरूपात अपहार केला असून, त्याची ९९ हजार ७३० रुपये किंमत आहे. हा अपहार १९७०-७१ या वर्षात झाला आहे.बांधकाम विभागाने १९८९-९० मध्ये कोट्यवधी रुपयांचे डांबर खरेदी केले होते. डांबराच्या रिकाम्या बॅरेलची किंमत ४३ हजार ७८० रुपये अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून वसूल केली नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने शासकीय निधीतील शिल्लक रक्कम कमी दाखवून शासकीय निधीतील एक लाख पाच हजारावर डल्ला मारला आहे. हा अपहार २००३ ते २००५ या कालावधितील असून, वसुली काहीच झाली नाही. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील शेती अवजारे ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिली जात आहेत. शेतकऱ्यांच्या हिश्श््याचे त्यांनी ३ लाख ३५ हजार ७६ रुपये भरले होते. या हिश्श्यावरच लाभार्थी कर्मचाऱ्याने डल्ला मारला आहे. हा घोटाळा उघडकीस येऊन पाच वर्षे झाली तरीही ती रक्कम वसूल झाली नाही. कवठेमहांकाळ पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक अमोल शिंदे यांनी ३ लाख ७३ हजारांचा गैरव्यवहार केला असून, त्यांच्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे. त्यांच्याकडूनही गैरव्यवहाराची रक्कम वसूल झाली नाही. कवठेमहांकाळ पंचायत समितीमधीलच तत्कालीन रोखपाल सन्नीकर यांनी १९६९ मध्ये १२ हजार २३६ रुपयांचा अपहार केला आहे. गेल्या ४५ वर्षांत यातील एक रुपयाही वसूल झाला नाही. संबंधित कर्मचारी सेवानिवृत्तही झाले आहेत.समाजकल्याण विभागामार्फत पाचवी ते सातवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जातीतील मुलींना सावित्रीबाई फुले उपस्थिती भत्ता दिला जातो. या भत्त्याच्या रकमेतील ८८ लाख ९८ हजार ६०० रुपयांच्या निधीवर २०१२-१३ या वर्षात येथील कर्मचाऱ्याने डल्ला मारला होता. हा घोटाळा पचल्यानंतर पुन्हा याच आर्थिक वर्षाच्या शेवटी ९ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा अपहार केला. यावेळी वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना शासकीय निधीतील अपहार होत असल्याचे उघडकीस आले आणि त्या कर्मचाऱ्याचा गैरव्यवहार उजेडात आला. त्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषी कर्मचाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून वीस लाख रुपये वसूल झाले. पण, त्यानंतर एक रुपयाही वसूल झाला नाही. सध्या हा कर्मचारी बिनधास्त फिरत आहे.घोटाळे करणाऱ्यांवर कारवाईसाठी शासनाने कायद्यातच बदल करून कठोर शिक्षेची तरतूद केली पाहिजे. अपहाराची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांची मालमत्ता विक्री करून तात्काळ वसूल झाली, तरच घोटाळ्यांना चाप बसू शकतो. विभागनिहाय अपहारविभागअपहारवर्षबांधकाम४३७८०१९८९छोटे पाटबंधारे ८१८७८१९८२सामान्य प्रशासन ५६८९९२१९९६आरोग्य३८४७७१९८६आ. केंद्र, आटपाडी२६१५९१९८१ग्रा. पाणी पुरवठा१०५०००२००३कृषी८७०३०२०१०क.महांकाळ पंचायत समिती३८५१३६२०१२समाजकल्याण ९८८५०००२०१३एकूण ११२२१४५२