लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : दि आष्टा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सभासदांना अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात येत आहेत. आरटीजीएस, एनईएफटी, मोबाइल बँकिंग, सीटीएस चेक सुविधा, एसएमएस बँकिंग, रूपे डेबिट कार्ड या सेवांचा बँकेच्या सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष कौशिक वग्यानी यांनी केले.
येथील दि आष्टा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रकाश आप्पासाहेब आडमुठे यांचा 'कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी आदर्श शाखा म्हणून अंकलखोप, भोसे व कुपवाड शाखेचे अध्यक्ष, शाखाधिकारी यांच्यासह सुजित वाडकर यांचा आदर्श अधिकारी, सायली कवठेकर यांचा आदर्श लेखापाल व सचिन इंगवले यांचा आदर्श शिपाई यांचा गौरव करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष कौशिक वग्यानी, उपाध्यक्ष अनिल मडके तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती मासाळ यांचा ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बबन थोटे, दिलीप वग्यानी, जयदीप थोटे, अनिल पाटील, विराज शिंदे, दादासाहेब कोरुचे, फंचू हालुंडे, सुनील वाडकर, अजित शिरगावकर, पुरणकुमार माळी, रामचंद्र सिद्ध, विष्णू वारे, उषाराणी आवटी, उषा कवठेकर, विनोद पाटील, अनिल चौगुले आदी उपस्थित होते. संदीप तांबेकर यांनी सूत्रसंचालन केले.