सुरेंद्र शिराळकर आष्टा : आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी शासकीय जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करावी या मागणीसाठी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समितीच्या वतीने गुरुवार पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. ४८ तासात भूखंड हस्तांतर न झाल्यास शनिवार दि. ३१ डिसेंबर पासून आष्टा बंद ठेवण्याची घोषणा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.आष्टा येथील छत्रपती शिवाजी चौकातील गट क्रमांक १०७५ मधील खुला भूखंड महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे. आष्टा नगरपालिकेने २२ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय ठराव करून पालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. वारंवार मागणी करून सुद्धा संबंधित भूखंड पालिकेकडे हस्तांतरित न झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. गुरुवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार अनंत गुरव यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली. मात्र निर्णय न झाल्याने संघर्ष समितीने आंदोलन सुरू ठेवले आहे.यावेळी पोपट भानुसे, मोहन पाटील, वीर कुदळे, अमोल पडळकर, सागर ढोले, सुधीर पाटील, गौरव नायकवडी, पृथ्वीराज पवार, राहुल महाडिक, वैभव शिंदे, नितीन शिंदे, दिग्विजय सूर्यवंशी, विशाल शिंदे, रघुनाथ जाधव, विराज शिंदे, संग्राम फडतरे, अंकुश मदने, महेश खराडे, संग्राम जाधव, अनिल गुरव, विश्वजित पाटील, ज्ञानदेव पवार, संजय ननवरे, अजय वाघमारे, प्रमोद सावंत यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी आष्टा संघर्ष समितीचे सांगलीत धरणे, 'आष्टा बंद'चा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 11:53 AM