शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

आष्ट्याची सत्ता विरोधक उलथविणार?

By admin | Published: October 24, 2016 12:30 AM

नगरपालिका निवडणूक : १० प्रभागांतील २१ जागांसाठी लढत

सुरेंद्र शिराळकर ल्ल आष्टा आष्टा नगरपरिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होत आहे. पालिकेत माजी आमदार विलासराव शिंदे, माजी मंत्री आमदार जयंत पाटील गटाची सत्ता आहे. ती उलथवून टाकण्यासाठी विरोधी लोकशाही आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधक एकवटले आहेत. ओबीसी महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित आहे. १० प्रभागातील २१ जागांसाठी कोणाला संधी मिळणार, याची चर्चा असून सत्ताधारी विकास कामांवर, तर विरोधक भ्रष्टाचार व सत्ताधारी गटाविरोधी लाटेवर स्वार होऊन प्रचार करणार आहेत. आष्टा पालिकेत जयंत पाटील-विलासराव शिंदे गटाची सत्ता राहिली आहे. शिंदे-पाटील संघर्ष संपल्यानंतर आष्टा पालिका १९९६ नंतर विलासराव शिंदे गटाकडे आली. त्यानंतर पालिकेत बेरजेचे राजकारण करीत दोन्ही गट एकत्र आले आहेत. काही वेळा नुरा कुस्ती करण्यात आली, मात्र दोन्ही नेत्यांनी विरोधकांना पालिकेत येऊ दिले नाही. याला अपवाद फक्त २००६ ची बिनविरोध निवडणूक राहिली. विलासराव शिंदे यांनी पुत्र विशाल शिंदे यांचा अर्ज काढून शिवसेनेचे विनायक इंगवले यांना संधी दिली. त्यानंतर २०११ च्या पालिका निवडणुकीत शिंदे गट १३, तर पाटील गट ६ जागा, अशा १९ जागा लढवल्या गेल्या व त्यांनी सर्वच्या सर्व १९ जागा जिंकल्याा. विरोधक काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे व अपक्ष यांनी ५३ टक्के, तर सत्ताधारी गटाने ४७ टक्के मते मिळविली. विरोधकांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याने पुन्हा सत्ताधारी गटाने बाजी मारली. गतवेळच्या पराभवाने विरोधकांनी बोध घेतला आहे. शिवसेना, काँग्रेस, मनसे, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन आष्टा शहर लोकशाही आघाडी स्थापन केली आहे. काँग्रेसचे राहुल थोटे, बाबासाहेब कुलकर्णी, अण्णासाहेब मालगावे, दिलीप कुरणे, बी. एल. पाटील, अमोल पडळकर, शिवसेनेचे वीर कुदळे, हणमंतराव सूर्यवंशी, पोपट भानुसे, मनसेचे राजकुमार सावळवाडे, भाजपचे डॉ. सतीश बापट, स्वाभिमानीचे गुंडा भाऊ आवटी यांच्यासह कार्यकर्त्यांनी लोकशाही आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी गटाला आव्हान दिले आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व विलासराव शिंदे करीत असून, आ. जयंत पाटील यांनी सर्व अधिकार शिंदे यांना दिले आहेत. १९९६ पासून शिंदे यांनी सर्व जाती-धर्माला विविध पदांवर संधी दिली आहे. शिंदे यांनी नवीन पाणीपुरवठा योजना, भाजी मंडई, फिश मार्केट, घरकुल योजनेतून सुमारे २४०० घरे, बहुउद्देशीय हॉल, १६१ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध मार्गांचे नामकरण, तसेच प्रवेशद्वार, हॉल, रस्ते यांना नावे देण्यात आली आहेत. अष्टलिंगांपैकी सात लिंगांचा जीर्णोद्धार, सर्व रस्ते, गटारी, फूटपाथ, एलईडी दिवे यांसह विविध विकासकामे शहर व उपनगरांत झाली आहेत. या विकास कामांवरच सत्ताधारी गट निवडणुकीस सामोरा जात आहे. शिंदे गटाचे शहराच्या राजकारणात प्राबल्य आहे. त्यात जयंत पाटील गट साथीला असल्याने सत्ताधारी गट पालिकेवर पुन्हा झेंडा फडकविण्याच्या तयारीत आहे. आष्टा शहराची लोकसंख्या ३७ हजार १०५ आहे. एकूण मतदार २६ हजार ९९६ असून पुरुष मतदार १४ हजार २९, तर स्त्री मतदार १२ हजार ९६७ आहेत. यापूर्वी पालिकेसाठी एकूण ५ प्रभाग होते, त्यातून १९ नगरसेवक निवडून आले. पालिकेच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी १९ ऐवजी २१ प्रभाग झाले आहेत. यासाठी एकूण १० प्रभाग असून ९ प्रभागात २ उमेदवार, तर एका प्रभागात ३ उमेदवार असणार आहेत. एकूण २१ पैकी ११ महिला, तर १० पुरुष उमेदवार आहेत. आगामी निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार, यावरच नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. नगराध्यक्ष आरक्षण : ओबीसी महिला नगराध्यक्षपद ओबीसी स्त्री उमेदवारासाठी राखीव असल्याने नगराध्यक्ष निवडणूक होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी लोकशाही आघाडीने माजी नगरसेवक अमोल पडळकर यांच्या पत्नी लता पडळकर यांना संधी दिली आहे, तर शिंदे गटाकडे या पदासाठी रांग लागली आहे. माजी नगराध्यक्ष रंजना शेळके, ऊर्दू हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका आयेशा इनामदार, वैशाली बोते, झिनत आत्तार, संभाजी माळी यांच्या पत्नी, जयंत पाटील गटाकडून पुष्पलता माळी, सुशिला शेळके, जमीलाबी लतीफ, माजी नगरसेविका ललिता वाकळे यांच्या स्नुषा यांच्यासह जैन समाजातील ओबीसी दाखला असणाऱ्या नेत्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आष्टा नगराध्यक्षपद ओबीसी महिला उमेदवारासाठी राखीव आहे. शहरात धनगर, जैन, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. धनगर, मुस्लिम व इतर समाजाला संधी मिळाली आहे. जैन समाजाच्या महिलेला अद्याप संधी मिळाली नसल्याने, जयंत पाटील व विलासराव शिंदे कोणाला संधी देणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. आष्टा शहरात शिंदे व पाटील गट सत्तेत आहे. या गटाकडून संधी मिळावी म्हणून सर्वजण प्रयत्न करीत आहेत. मात्र संधी न मिळाल्यास नाराजांची मते विरोधकांना मिळणार, अशी चर्चा आहे. रंगणार चुरशीचा सामना पालिकेसाठी अर्ज भरण्यास काही दिवस उरले आहेत. दोन्ही बाजूने खलबते सुरु आहेत. सत्ताधारी गटाच्या प्रचाराची धुरा विलासराव शिंदे, जयंत पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यावर आहे, तर विरोधी लोकशाही आघाडीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खा. राजू शेट्टी, पणनमंत्री सदाभाऊ खोत, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी वनमंत्री आ. पतंगराव कदम यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे नेते येणार आहेत. पालिकेच्या निवडणुकीनिमित्त सत्ताधारी व विरोधकांत चुरशीचा सामना रंगणार आहे.