शहरात लाखो रुपये खर्चून भुयारी गटारींची कामे सुरू आहेत. या कामांसाठी शहरातील अंतर्गत रस्ते ठिकठिकाणी उकरले आहेत. दोन वर्षांपासून सुरू असणारे गटारींचे काम आजतागायत निम्मेही झाले नाही. अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी गटारीचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी ठेकेदाराकडून पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे काम करण्याची घाई करण्यात येत आहे. शनिवारी शहरातील ढवळवेस भागात रस्त्यावर डांबरीकरण सुरू होते. त्याच वेळेस दुपारी तीननंतर शहरात तासभर जोरदार पाऊस झाला. या पडत्या पावसातही ठेकेदाराने हे काम सुरू ठेवले होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक वैभव भाट यांनी भरपावसात सुरू असणारे डांबरीकरण बंद पाडले. कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करा, अशी मागणी नगरसेवक भाट यांनी केली आहे.