शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ची सांगता

By admin | Published: May 28, 2017 11:47 PM

‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : करिअरविषयक प्रश्नांबाबत अचूक उत्तर देणाऱ्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ची शनिवारी विद्यार्थी, पालकांच्या गर्दीत उत्साहात सांगता झाली. प्रदर्शनातून मिळालेल्या माहितीबद्दल पालक, विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. येथील राम मंदिर चौक परिसरातील कच्छी जैन भवनात शुक्रवारपासून सुरू असलेल्या या आगळ्यावेगळ्या आणि विद्यार्थी, पालकांतील करिअरविषयक दिशा स्पष्ट करणाऱ्या प्रदर्शनाचा शनिवारी शेवटचा दिवस असल्याने शहरासह जिल्हाभरातून विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली होती. या प्रदर्शनास पालक विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षण आणि करिअरबाबत एकाच छताखाली माहिती मिळविण्याची शेवटची संधी असल्याने आज सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थी, पालक प्रदर्शनात येऊ लागले. येथील प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरचा कल लक्षात घेऊन आपल्या संस्थेमधील विविध अभ्यासक्रम, त्यांच्या कालावधीसह शुल्काची सविस्तर माहिती देण्यात येत होती. प्रदर्शनाची वेळ संपेपर्यंत विद्यार्थी, पालकांची गर्दी कायम राहिली.आजकाल यश मिळविण्यासाठी केवळ गुण आवश्यक नसतात, तर पुढील करिअरसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ‘लोकमत’ने अशा उपक्रमातून विद्यार्थी व पालकांना एक दिशा निर्माण करून दिली आहे. करिअर घडविताना आपल्या विचारांपेक्षा आपल्या आई-वडिलांच्या विचारांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण आई-वडीलच मुलांच्या आयुष्याबाबत योग्य निर्णय घेत असतात. सध्या चांगल्या दर्जाच्या संस्था आपल्या भागातही कार्यरत असून, पालकांनी योग्य निर्णय घेऊन मुलांसाठी प्रवेश घ्यावा. मुलांनी आयुष्यात काय करावे, यासाठी पालकांनी अजिबात अट्टाहास करता कामा नये. मुलांना त्यांचे करिअर निवडताना पूर्ण मुभा देणे आवश्यक आहे. त्यांच्या आवडीनुसार जर करिअर निवडले गेले, तर मुले यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते. मुलांनी आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, याचा ठोस निर्णय घ्यावा. हा निर्णयच करिअर घडवितो. प्रदर्शनानिमित्त आयोजित विविध सत्रांमध्ये शनिवारी ‘विद्यार्थी आणि पालक’ या विषयावर डॉ. प्रदीप पाटील यांनी, तर ‘पदवी करत युपीएससी, एमपीएससीची तयारी कशी करावी?’ या विषयावर युनिक अ‍ॅकॅडमीचे प्रवीण चव्हाण यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाबरोबरच चॅम्पियन आॅफ द मॅथ्स व लोकमत फॅशन आयडॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. याला विद्याथ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. करिअरची दिशा झाली स्पष्टदहावी आणि बारावीनंतर करिअरची विद्यार्थ्यांना वाट चोखाळताना नेमक्या वळणावर मिळणारी दिशा, आयुष्यातील ध्येयापर्यंत घेऊन जात असते. याचसाठी करिअरची दिशा स्पष्ट करण्यासाठी शुक्रवारपासून सुरू असलेले ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ उपयोगी ठरल्याचे मत विद्यार्थी व पालकांनी मांडले. गेले दोन दिवस सुरू असलेल्या या शैक्षणिक प्रदर्शनात असलेल्या स्टॉल्सवरील परिपूर्ण माहिती व या कालावधित विविध विषयांवर त्या-त्या क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शकांचे झालेले मार्गदर्शन उपयोगी ठरल्याचेही पालकांनी आवर्जून सांगितले. या उपक्रमाला शहरासह परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.स्टॉलधारकांचा सन्मानशुक्रवार, दि. २६ मेपासून सुरू असलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’मध्ये राज्यभरातून अनेक नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. यात इंजिनिअरिंंग क्षेत्रासह प्रकाशन संस्था, व्यावसायिक शिक्षण संस्था, स्पर्धा परीक्षा अ‍ॅकॅडमींचा समावेश होता. या सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींचा शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याहस्ते शिल्ड देऊन गौरव करण्यात आला.