शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

चढाई करणारा वर्षातील पहिला भारतीय : आसदच्या तरुणाचा माऊंट किलिमांजारोवर झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:25 AM

चढाईसाठी प्रतिकूल वातावरण, उणे १५ ते २० अंश तापमान, अतिबर्फवृष्टी अशी परिस्थिती असतानाही प्रचंड आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर श्रीकांतने भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी माऊंट किलिमांजारोवर तिरंगा फडकवला. हे शिखर सर्वांत लवकर सर करणारा श्रीकांत या वर्षातील पहिला गिर्यारोहक ठरला आहे.

ठळक मुद्देकमी वेळेत शिखर सर ; प्रतिकूल वातावरण-उणे तापमान-अतिबर्फवृष्टीवर मात

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : आसद (ता. कडेगाव) येथील श्रीकांत संभाजी जाधव या २९ वर्षीय तरुण अभियंत्याने आफ्रिका खंडातील सर्वात उंच ५८९५ मीटर उंचीचे ‘माऊंट किलिमांजारो’ हे शिखर सर केले आहे.

चढाईसाठी प्रतिकूल वातावरण, उणे १५ ते २० अंश तापमान, अतिबर्फवृष्टी अशी परिस्थिती असतानाही प्रचंड आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर श्रीकांतने भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी माऊंट किलिमांजारोवर तिरंगा फडकवला. हे शिखर सर्वांत लवकर सर करणारा श्रीकांत या वर्षातील पहिला गिर्यारोहक ठरला आहे.

श्रीकांत जाधव हा तरुण अभियंता सध्या पुण्यातील खासगी कंपनीत कार्यरत आहे. गेल्या सात वर्षांपासून तो गिर्यारोहण करतो. त्याने आतापर्यंत हिमालयातील माऊंट टेबल टॉप, माऊंट मैत्री, माऊंट मेंटोक कांगरी, एव्हरेस्ट बेस कॅम्प, काला पत्थर या मोहिमा फत्ते केल्या आहेत.

यावर्षी श्रीकांतला आफ्रिकेतील किलिमांजारो शिखर खुणावत होते. ते त्याने एकट्यानेच सर करायचे ठरवले. त्यासाठी एव्हरेस्टवीर अरुण तापकीर आणि कामगार नेते अरुण बोराटे आणि आफ्रिकेतील स्थानिक गाईड मुसा यांनी मार्गदर्शन केले. त्याने २२ जानेवारीला चढाईला सुरुवात केली. यासाठी ‘मचाने मे’ हा सर्वात अवघड मार्ग निवडला. या मार्गाने शिखर सर करण्यास सात दिवस लागतात, तरीही तो मार्ग त्याने निवडला. आजपर्यंत या मार्गाने केवळ भारताबाहेरचे गिर्यारोहक जात होते. मात्र कमी दिवसात या मार्गाने शिखर सर करुन २६ जानेवारीला श्रीकांतला शिखरावर तिरंगा फडकवायचा होता. त्यादृष्टीने त्याने प्रयत्न केले. पाचव्या दिवशी शिखर सर करुन २६ जानेवारीस सकाळी सव्वानऊ वाजता किलिमांजारो शिखरावर पोहोचल्यावर त्याने तिरंगा फडकवला. या शिखरावर या वर्षात सगळ्यात अगोदर पोहोचणारा गिर्यारोहक हा मान त्याला मिळाला आहे.

दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नेहमीच पाठबळ लाभल्याने हे शिखर सर करून त्यांना श्रध्दांजली अर्पण केल्याचे श्रीकांतने सांगितले.

या मोहिमेसाठी उद्योजक प्रकाश छाब्रिया, रितु छाब्रिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, डॉ. जितेश कदम, दिग्विजय कदम, शरद लाड यांचे प्रोत्साहन आणि मदत मिळाल्याचे त्याने सांगितले.

गावकऱ्यांना अभिमानआसद गावातील श्रीकांत जाधव यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंचीचे शिखर सर केले. ही बाब गावासाठी अभिमानाची व युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत सरपंच मनीषा जाधव यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :SangliसांगलीTrekkingट्रेकिंग