शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

‘लव्ह जिहाद’च्या नावाने महिलांवरील अत्याचार किती दिवस सहन करणार? - नितेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:17 AM

पलूसमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चाची सभा

पलूस : भारतात, महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या नावाने हिंदू भगिनींवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. हे आपण किती दिवस सहन करणार आहाेेत. हिंदू जागृत होणार आहेत की नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत आम्ही तयार झालो आहोत आणि केंद्रात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.पलूस येथे मंगळवारी शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्यावतीने आयोजित सभेत राणे बोलत होते. यावेळी हर्षाताई ठाकूर व माजी खासदार अमर साबळे उपस्थित होते. प्रारंभी पलूस शहरातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.राणे म्हणाले, आपल्या देशात हिंदूंच्या विरोधात ‘लव्ह जिहाद’ हे खूप मोठे षडयंत्र आहे. भारत देश हिंदूंचा राखायचा असेल, तर हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. हिंदू सतर्क राहिला नाही याची माेठी किंमत माेजावी लागेल, हे लक्षात ठेवा.लव्ह जिहाद व वक्फ बोर्ड हे एक माेठे षडयंत्र आहे. हा कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द झालाच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. केंद्रातील भाजपा सरकारकडून लवकरच वक्फ बोर्डाबाबत हिंदूंना गोड बातमी मिळेल.यावेळी विवेक साबळे व हर्षाताई ठाकूर यांची भाषणे झाली. सुरुवातीला पलूस येथील कुंडल वेस, मुख्य बाजारपेठ, मुख्य चौकातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सर्जेराव नलवडे, रामानंद पाटील, संग्राम कुलकर्णी, प्रदीप वेताळ, रोहित पाटील व नागरिक, युवक उपस्थित होते.

लव्ह जिहाद हे षडयंत्रराणे म्हणाले, लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू भगिनींवर अत्याचार सुरू आहेत. वक्फ बोर्ड हेही एक षडयंत्र आहे. देशातील तमाम हिंदू बांधवांनी याबाबत वेळीच जागरुक झाले पाहिजे. हा कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द झालाच पाहिजे. यासाठी व्यापक आंदाेलन उभारण्याची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीNitesh Raneनीतेश राणे HinduismहिंदुइझमLove Jihadलव्ह जिहादWomenमहिला