शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

आटपाडीतील विद्यार्थी शुल्कमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 11:27 PM

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : शासनाने आटपाडी तालुक्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. शासनाने दुष्काळ जाहीर ...

अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : शासनाने आटपाडी तालुक्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या भागातील शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात आजअखेर तालुक्यातल्या एकाही विद्यार्थ्याची परीक्षा फी माफ झालेली नाही. आटपाडी तालुक्यातील ४ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी तब्बल २२ लाख २७ हजार ५ रुपये एवढी परीक्षा फी १० वी आणि १२ वीसाठी भरली आहे.काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याऐवजी नेहमी टंचाईसदृश स्थिती जाहीर करायचे; पण सध्याच्या भाजप-शिवसेना युतीच्या शासनाने थेट दुष्काळ अशा शब्दात दुष्काळ जाहीर केला. पण शासनाची ही घोषणा केवळ शब्दांचे बुडबुडे ठरली आहे. टंचाई काय आणि दुष्काळ काय त्यावर उपाययोजना काहीच होत नसतील, तर त्याचा लोकांना काहीच उपयोग नाही.गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करताना त्या भागातील जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्ज्यन्याची तूट, उपलब्ध असलेली भूजलाची कमतरता, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकाची परिस्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन एवढा अभ्यास करुन दुष्काळ जाहीर केला. पण दुष्काळावरील उपाययोजना राबविण्यात फोल ठरल्याने शासनाचा हा सगळा अभ्यास वाया गेला आहे.शासनाने दि. ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी दुष्काळी तालुक्याची जी पहिली यादी जाहीर केली (शासन निर्णय क्रमांक : एससीवाय २०१८/प्र.क्र.८९/म-७) त्यामध्ये आटपाडी तालुक्याचा समावेश आहे. या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, दुष्काळ घोषित केल्याचा आदेश दि. ३१ आॅक्टोबर २०१८ पासून अंमलात येतील. पण त्यानंतर दि. ६ नोव्हेंबरनंतर इयत्ता १० वीचे परीक्षेचे अर्ज भरण्यात आले. इयत्ता १२ वीसाठी १ आॅक्टोबरपासून ते दि. ६ नोव्हेंबरपर्यंत परीक्षेचे अर्ज विद्यार्थ्यांनी भरले. यापैकी एकाही विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क शासनाने माफ केलेले नाही. इयत्ता १० वीसाठी आटपाडी तालुक्यातून ४५३२ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ३१५ रुपये एवढी परीक्षा फी भरुन अर्ज भरले आहेत. तर इयत्ता १२ वीसाठी तालुक्यातील १८८१ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ४२५ रुपये एवढी परीक्षा फी भरली आहे.विशेष म्हणजे इयत्ता १० वीसाठी दि. १ डिसेंबर २०१८ पर्यंत म्हणजे शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर एक महिन्याने परीक्षा फी भरायची होती. तरीही यावर कसलीच अंमलबजावणी झाली नाही. १० वीसाठी दि. १५ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्काने, तर सध्या ही अतिविलंब शुल्क भरुन परीक्षेचे अर्ज भरुन घेण्यात येत आहेत.इयत्ता १२ वी साठीची अशीच परिस्थिती आहे. दि. १ जानेवारी २०१९ पर्यंत अतिविलंब प्रवेश शुल्क, तर दि. १६ जानेवारीपर्यंत विशेष अतिविलंब शुल्क घेऊन परीक्षेचे अर्ज भरुन घेत आहेत. त्यामुळे या घोषणाबाज शासनाविरुद्ध विद्यार्थी आणि पालकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.२२ लाख फीसाठी ६४ लाखांचा खर्चशासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या आदेशातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी हा दुष्काळग्रस्तांना देण्यात आलेल्या सवलतींचा पाचवा मुद्दा आहे. गेल्या दोन महिन्यात कुठल्याही विद्यार्थ्यांची ५ रुपये सुद्धा परीक्षा फी या आदेशाने माफ झालेली नाही. भविष्यात परीक्षा मंडळाने ही फी परत दिलीच, तर ती रक्कम शाळेच्या मुख्याध्यापकांना धनादेशाद्वारे येईल. मग मुख्याध्यापकांना १० वीच्या विद्यार्थ्यांना ३२५ रुपयांचा आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना ४२५ रुपयांच्या धनादेशाद्वारे द्यावी लागेल. मग हे पैसे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेत बचत खाते उघडावे लागेल. त्यासाठी त्यांना किमान एक हजार रुपये बँकेत जमा करावे लागतील म्हणजे त्यासाठी ६४ लाख १६ हजार रुपये एवढी रक्कम दुष्काळी भागातील पालकांना पुन्हा भरावी लागणार आहे. पुढील शिक्षणासाठी गाव सोडलेल्या विद्यार्थ्यांसह बँकेत खाते नाही म्हणून बहुतांश विद्यार्थ्यांना शासनाच्या परीक्षा फी माफीच्या घोषणेचा उपयोग होणार नाही.दुष्काळी परिस्थितीत पठाणी वसुलीदुष्काळग्रस्तांना या कठीण परिस्थितीत शासन काही मदत करेल, अशी आशा असते. आता संकटाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून फी घेणे कदापी योग्य नाही. आतापर्यंत किती शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची फी परत द्या, असे प्रस्ताव केले आहेत. फी कधी मिळेल हे कुणालाच माहिती नाही. त्यामुळे गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या भागातील विद्यार्थ्यांसाठीसुद्धा काही सेकंदात ई-मेलने आदेश दिले जात असताना, त्यावर कारवाई होत नाही, हे विशेष.