अविनाश बाड - आटपाडी -आटपाडी तलावात पुरेसा पाणीसाठा असूनही केवळ कारभारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे आटपाडीकरांना ७ ते १० दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे. ते पाणीही अशुध्द असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.आटपाडी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारींच्या वीज बिलाची ८७ लाख एवढी थकबाकी आहे. त्यामुळे वीज कंपनी वारंवार वीजपुरवठा बंद करण्यासाठी कनेक्शन तोडत आहे. मंगळवारी वीज कंपनीने थकबाकीसाठी कनेक्शन तोडले. त्यामुळे गावचा पाणी पुरवठा ठप्प झाला. आज (बुधवारी) दुपारी अडीच लाख रूपये थकबाकी भरल्यानंतर सायंकाळी वीज कंपनीने कनेक्शन जोडले. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्य केवळ कुठले काम मिळतेय, यावरच सारखी नजर ठेवून असल्याची खेदजनक चर्चा होत असताना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसून येत नाही. आटपाडी तलावातील पाणी सायपनने पाणी पुरवठा विहिरीत टाकून तिथून गावाला पाणी पुरवठा केला जातो. सध्या तलावात पाणीसाठा पुरेसा उपलब्ध आहे. मात्र या पाण्यावर कसलीही प्रक्रिया न करता थेट पाणी पुरवठा केल्याने अनेकदा गढूळ, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी पिल्याने नागरिकांना पोटाचे आजार होत आहेत. याकडे सर्वच नेतेमंडळींसह प्रशासनाचेही अक्षम्य दुर्लक्ष असलेले दिसून येत आहे. वेळोवेळी लाखो रूपये भरूनही वीजबिलाच्या थकबाकीचा आकडा कागदावर ‘जैसे थे’ दिसत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या सर्व बाबींची सक्षम अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी, तातडीने हा प्रश्न निकालात काढावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.अद्याप उन्हाळ्याची तीव्रता कायम आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याची मागणी वाढली आहे. १०० लिटर पाणी ज्यांना लागत होते, त्यांची अपेक्षा आता दुप्पट पाणी द्यावे, अशी आहे. सध्या ८७ लाख रूपयांचे वीजबिल थकित आहे. परिणामी वीजपुरवठ्याचा प्रश्न होता. विविध पातळीवर प्रयत्न करून आज सायंकाळी वीज पुरवठा पूर्ववत जोडण्यात आला आहे. सर्वच अडचणींना सामोरे जात सध्या ७ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. - उत्तम पाटील, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत आटपाडीवीज बिलाचा सावळा गोंंधळ आटपाडी ग्रामपंचायतीच्या फक्त पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारींच्या वीज बिलाच्या थकबाकीचा आकडा गेली ८ ते १० वर्षे बदलायला तयार नाही. सातत्याने १ कोटी रूपयांच्या आसपास वीजबिल थकित असल्याचे सांगितले जात आहे. वारंवार लाखो रुपये भरुनही पुन्हा एवढी मोठी रक्कम थकित कशी होते? याबाबत वीज वितरण कंपनीसह ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.अपुरा आणि अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोकाग्रामपंचायत प्रशासन, सदस्य, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्षशुध्दीकरणाची कोणतीही प्रक्रिया न करता तलावातून थेट पाणीपुरवठाआठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकरण्याची वेळवीजबिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी
आटपाडीत आठवड्यातून एकदाच पाणी!
By admin | Published: June 17, 2015 11:10 PM