पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील परिसरात जनावरे चोरीला जाण्याचे प्रमाण वाढते आहे. यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेली चार ते पाच महिन्यांपूर्वी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या डॉ. सुयोग शेटे यांच्या शेतीमधील गोठ्यातून चार जनावरे चोरी झाली होती. परंतु त्याचा तपास झाला नाही. तोपर्यंतच गोळेवाडी-सुरूल रस्ताजवळ सुधाकर पाटील यांच्या मळ्यानजीक गणेश अशोक जाधव या युवा शेतकऱ्याच्या वस्तीवरून तीन गाय व दुध काढण्याचे मशीन अंदाजे अडीच लाख रुपये किमतीची जनावरे चोरी करून नेली आहे. या चोरांनी लाईट नसल्याने त्याच्या फायदा चोरट्यांनी उठविला आहे. अशा घटना होत असल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक भागात बिबट्याव्दारे जनावरांच्या गोठ्यांवर होणारे हल्ले या सर्व कचाट्यात असणारे शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडला आहे तरी संबंधित शासकीय खात्याने तपास करावा व शेतकरी भयमुक्त करावे, अशी मागणी केली जाते आहे. या गुन्हाची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.