ग्रामीण रुग्णालयाच्या मागे डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने आहेत. येथील डॉ. अशोक लवटे हे निवासस्थानाला कुलूप लावून सहकुटुंब परगावी गेले होते. दि. ३० ऑगस्ट २० रोजी चोरट्यांनी कुलूप तोडून त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर कर्मचारी मोहन काळे यांच्या घराच्या दरवाजाच्या जाळीतून आत हात घालून चोरट्यांनी आतील कडी काढली होती. घरात प्रवेश करून मोबाइल लंपास केले. त्यावेळी मोहन काळे जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे पळून गेले होते. या चोरीतील चोरट्यांनी लंपास केलेला ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. पोलीस निरीक्षक भानुदास लिंबोरे यांनी मोहन काळे आणि डॉ. लवटे यांच्या ताब्यात दिला. यावेळी हवालदार वैशाली जाधव उपस्थित होत्या.
फोटो : २५ आटपा`ी १
ओळी : आटपाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भानुदास लिंबोरे यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या निवासस्थानी चोरी झालेला ऐवज मोहन काळे यांच्या ताब्यात दिला.