संस्थेचे भागभांडवल ४१ लाख ४ हजार, निधी १६ लाख ९६ हजार, ठेवी ३ कोटी ५३ लाख असून, कर्जे ३ कोटी ४२ लाख व गुंतवणूक ५७ लाख ७९ हजार इतकी आहे. सिडी रेशो ७९.५३ टक्के व थकबाकी १.१८ टक्के इतकी आहे.
चालू आर्थिक वर्षात सतत लॉकडाऊन, आर्थिक मंदी अशा परिस्थितीतदेखील संस्थेने चालू आर्थिक वर्षात चांगली प्रगती केली आहे.
संस्थेचे मार्गदर्शक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगती कौतुकास्पद आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये संचालक राजेंद्र लाटणे, दीपक देशमुख, महेश देशमुख, विकास भुते, सागर भागवत, सर्जेराव राक्षे, महादेव डोईफोडे, नितीन सागर, कैलास सपाटे, रंजना खटावकर, राणी कवडे, मोहन पारसे, सचिव दत्तात्रय स्वामी, सर्व कर्मचारी व पिग्मी एजंट यांचे सहकार्य लाभले.